प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) आज दि. २२ एप्रिल २०२४ रोजी वडज येथील कुलस्वामी खंडेराय देवस्थानामध्ये चिरंजीव विवेक व चि .सौ. का. प्...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
आज दि. २२ एप्रिल २०२४ रोजी वडज येथील कुलस्वामी खंडेराय देवस्थानामध्ये चिरंजीव विवेक व चि .सौ. का. प्राजक्ता यांच्या शुभविवाह प्रित्यर्थ वडज - विठ्ठलवाडी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध बैलगाडा मालक बाळासाहेब भिकाजी चव्हाण यांनी सामाजिक जाणिवेतून डिसेंट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित बेनके यांच्या शुभहस्ते ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे सचिव फकीर आतार व संस्थापक जितेंद्र बिडवई यांच्याकडे सुपूर्त केला.
डिसेंट फाउंडेशन ही सेवाभावी संस्था सामाजिक, शैक्षणिक, कृषी व आरोग्य विषयक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करीत असून चव्हाण कुटुंबाने मुलाच्या शुभविवाह निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जे दातृत्व दाखवले आहे ते कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, गुलाब पारखे, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव ढोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजने, दिलीप कोल्हे, संचालक प्रियांका शेळके, माजी सरपंच आदिनाथ चव्हाण, अजित चव्हाण, आदी मान्यवर व वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS