प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) लांडेवाडी दि ११ एप्रिल उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ महाराज य...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
लांडेवाडी दि ११ एप्रिल
उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लांडेवाडी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त हरिनाम सप्ताह आणि चारशे वर बैलगाडयांसह दोन दिवस बैलगाडा शर्यत संपन्न होत असुन मोठ्या संख्येने नामांकित बैलगाडयांसह शर्यत पार पडत आहे.
यात्रेनिमित्त प्रा सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख, आंबेगाव तसेच प्रा.अनिल निघोट मा. तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या.
यात्रा कमिटीतील जानकुशेठ पानसरे, सरपंच अंकुश लांडे,मा सरपंच तानाजी शेवाळे, रामदास आढळराव, पत्रकार सदानंद शेवाळे, गणेश शेठ शेवाळे, भगवान शेवाळे, बबनराव गव्हाणे यांनी यात्रेची ऊत्तम व्यवस्था पाहिली.
या बैलगाडा शर्यतीचे समालोचन आपल्या पहाडी आवाजात करुन साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर आणि माऊली पिंगळे यांनी शर्यतीचा थरार बैलगाडाशौकिनांपर्यंत पोहोचवुन प्रेक्षकांची दाद मिळवली.
COMMENTS