भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत...
भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक . त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक तर देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हंटले जाते .
आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे?
आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही
आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा
करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि
आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात
असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.
आणि आज ज्यांच्या योगदानामुळे संविधान कायदे हक्क कर्तव्य यांमुळेच आपली अर्थव्यवस्था सामाजिक व्यवस्था व स्वातंत्र्य मिळाले. अश्या थोर महापुरुषाला विसरणे अशक्यच आहे .
ज्यांच्या *‘Problem of Rupee* ’ या
ग्रंथातून ‘ *भारतीय रिजर्व बँकेची’* स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
#भीमजयंती
🌸🌸
होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
*‘विद्यार्थी दिवस* ’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.💯
डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
🌸🌸
‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏
जयंती नसावी फक्त एक दिवसासाठी
ती आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी
न्याय मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांचे स्मरण करण्यासाठी
तुमच्या आमच्यातला अत्याचाराविरुद्ध आवाज जागा होण्यासाठी...
आज एक संकल्प अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी
आज एक संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी .
लेखिका-शितल भगत
COMMENTS