जिविका फाउंडेशन व रोटरीचे सेवाभावी काम हे समाजासाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर या...
जिविका फाउंडेशन व रोटरीचे सेवाभावी काम हे समाजासाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी नारायणगाव ता. जुन्नर येथील वसंत व्हिला सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गर्भाशय प्रतिबंधक लसीकरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
नारायणगाव ता.जुन्नर येथे जिविका फाउंडेशन,रोटरी क्लब नारायणगाव व रोटरी क्लब बिबवेवाडी पुणे या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील सबनीस विद्यामंदिरातील इ.५वी ते ८वी मधील १० ते १४ या वयोगटातील सुमारे 300 विद्यार्थीनींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष संदीप गांधी यांनी दिली.
या कार्यक्रमप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर,नारायणगावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच योगेश उर्फ बाबुभाऊ पाटे,वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्याध्यक्ष डॉ.आनंद कुलकर्णी,सहकार्यवाह अरविंदभाऊ मेहेर,ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई आतार, सबनीस विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक,उपमुख्याध्यापक सतिश तंवर,पर्यवेक्षिका सुषमा वाळिंबे,पर्यवेक्षक विलास शिंदे, विद्यामंदिरातील सर्व शिक्षक वृंद, पालक,ग्रामस्थ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिविका फाउंडेशनच्या डॉ.रिद्धी मकवाना,डॉ.ज्योती शिंदे,डॉ.गायत्री,प्रथमेश सरगडे, सुदर्शन आनंदकर,रेखा वाव्हळ, कांचन वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था रोटरी क्लब नारायणगावचे प्रोजेक्ट डायरेक्टर मंगेश मेहेर,डॉ.रुपेश कामठे,डॉ.प्रशांत काचळे,डॉ.योगेश पाटील,योगेश भिडे,ब्रिजेश बांदिल,सचिन घोडेकर,फर्स्ट लेडी वर्षा गांधी,अमृता भिडे,निर्मला मेहेर यांनी केली.हेमंत महाजन यांनी सूत्रसंचालन केले.रोटरीचे माजी अध्यक्ष मंगेश मेहेर यांनी आभार मानले.
COMMENTS