प्रतिनिधी : पंकज सरोदे भारतीय बौद्ध महासभा, भीम जयंती महोत्सव संस्था, पंचशील तरुण मंडळ राजेवाडी यांचे संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेड...
प्रतिनिधी : पंकज सरोदे
भारतीय बौद्ध महासभा, भीम जयंती महोत्सव संस्था, पंचशील तरुण मंडळ राजेवाडी यांचे संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .संस्था दर वर्षी आयोजित करत अस्ते. यावेळी ध्वजारोहण साळवे गुरुजी यांनी केले. पूजापाठ नरेश कसबे यांनी केले. तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी राजेवाडी येथे उपस्थित राहून मानवंदना दिली. सचिन भोजने यांनी प्रबोधन केले. प्रमुख उपस्थितीत विकास मोरे, सुनील अंकुश, सचिन ढोणे,पंकज सरोदे, गणेश वाघमारे, विजय वाघमारे, विठ्ठल अंकुश, सुरेश शिंदे, गावच्या सरपंच शुभांगीताई साबळे , पोलीस पाटील विजय केंगले,दत्ता शिंदे,प्रल्हाद शिंदे, अमोल शिंदे दिपाली साबळे वंचित बहुजन आघाडी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजेवाडी शाळेला स्पर्धा परीक्षा तयारी साठी लागणारी पुस्तके व वाह्या भेट देण्यात आल्या. संस्थेचे जो मानस आहे की ज्या गावात जयंती साजरी केली जाते त्याठिकाणी स्पर्धा पुस्तक उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे प्रत्येक गावातून एक तरी अधिकारी तयार होईल. संस्थेचे हितचिंतक अमोल शिंदे गेले चार वर्ष ही पुस्तके उपलब्ध करून देत आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष साळवे गुरुजी होते. सूत्रसंचालन प्रल्हाद शिंदे यांनी केले तर आभार महेश वाघमारे यांनी मानले.
COMMENTS