प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) आज शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी भटकळवाडी ता. जुन्नर, जि. पुणे येथील माऊली जेष्ठ नागरिक संघातील त...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
आज शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी भटकळवाडी ता. जुन्नर, जि. पुणे येथील माऊली जेष्ठ नागरिक संघातील तीस आजी-आजोबांना स्वर्गीय शेवंताबाई बाबुराव शेटे व स्वर्गीय बाबुराव मारुती शेटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेटे परिवाराने डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आधार काठ्यांचे वाटप केले.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव फकीरा आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, सरपंच मेघा काकडे, माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानाभाऊ रासकर, सचिव नामदेव लेंडे, सावळेराम बाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सिताराम अभंग, अजित चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सतीश काकडे, गणपत अभंग, माजी सैनिक रत्नाकर काकडे, योगेश वाघचौरे, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS