प्रतिनिधी प्रा अनिल निघोट. आमोंडी ता.आंबेगाव दि.१८ एप्रिल आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर ...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट.
आमोंडी ता.आंबेगाव दि.१८ एप्रिल
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांनी तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या, तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेल्या शिवसेना शाखेचे शिवसैनिकांनी नुतनीकरण करून ग्रामस्थ व शिवसैनिकांना सुखद अनुभव दिला आहे.
कै. दत्तात्रय फलके,वामन फलके,शरद फलके, बबनराव फलके, कै.बाबुराव जाधव यांनी बांधलेल्या शाखेचे नुतनीकरणाचा ध्यास घेतलेले मार्गदर्शक शिवसैनिक सोमनाथ फलके यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी ऊपतालुकाप्रमुख निलम कारले, शिवसेना शाखाप्रमुख केतन फलके, युवा सेना ऊपतालुका प्रमुख गणेश फलके,ग्रा.पं सदस्य ताराबाई जाधव,ताईबाई काळे, मा.ऊपसरपंच कैलास फलके, संतोष फलके, मा सरपंच मारती काळे, उपविभाग प्रमुख मुंबई प्रल्हाद फलके, पंडित बिबवे, प्रतिभा हिंगे, सोपान केवाळे यांनी शिवसेना शाखा पुन्हा नव्याने दिमाखात सुरु केली असून शिवसैनिकांनी सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी सकाळ संध्याकाळ पाठपुरावा सुरू केला आहे.
सदर शाखेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट, भारतीय विद्यार्थी सेना मा. आंबेगाव तालुका प्रमुख प्रा.अनिल निघोट यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांचं कौतुक करून संपूर्ण शिवसेना परिवारासाठी प्रेरणादायी काम केल्याबद्दल आभार मानले.
COMMENTS