प्रतिनिधी: सिद्धी तलांडे बोतार्डे : आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती दत्त मंदिर तलांडे वस्तीपासून ते बोतार्डे गावठाण या ...
प्रतिनिधी: सिद्धी तलांडे
बोतार्डे : आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने नरसिंह सरस्वती दत्त मंदिर तलांडे वस्तीपासून ते बोतार्डे गावठाण या ठिकाणी तलांडे परिवाराचे कुलदैवताचे पुजन ढोल , ताशा, सनई चौघडे यांच्या गजरात श्रीफळ ,हार, महाप्रसादाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. त्यानंतर देवाची पूजा हार, श्रीफळ, आणि पेढ्याचा प्रसाद ठेवून पार पडली.त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS