माणिकडोह : जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे सारिका संतोष फुलपगार यांच्या घरासमोरील अंगणात १ वाघिणीचा व २ पिल्लांचा संचार रोज होत असतो. शुक्र...
माणिकडोह : जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे सारिका संतोष फुलपगार यांच्या घरासमोरील अंगणात १ वाघिणीचा व २ पिल्लांचा संचार रोज होत असतो.
शुक्रवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान घरासमोरील अंगणातच या बिबट्यांचा वावर होत असल्याने येथील रहिवासी पुरते घाबरून गेले होते, मात्र सकाळ होताच वनविभागाने येथे पिंजरा उपलब्ध केला मात्र वाघाचे नित्याचेच दर्शन होत असल्याने या ठिकाणी भितीदायक वातावरण पसरले आहे.
यावर वनविभाग प्रशासनाने योग्य दखल घेण्याची गरज असल्याचे फुलपगार यांनी सांगितले.
कारण या परिसरात ऊसाचे प्रमाण जास्त असून वाघांना लपण धरायला पुष्कळ जागा मिळते तसेच शेतात काम करायला व पाणी भरायला जाताना जीव मुठीतच धरून जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले, यावर वेळीच उपाययोजना करण्यात यावी असे येथील ग्रामस्थ व महिला भगिनी यांनी सांगितले.
COMMENTS