विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर, ता. १३ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाविद्यालय मध्ये विविध उपक्रमाचे आयोज...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर, ता. १३ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाविद्यालय मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.अॅड. संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे व मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी दिली.
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार,दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा डॉ.आर.डी.चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.बी.वाघमारे होते. जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन सभेच्या प्रतिमापूजन प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य मा.प्रा.पी.एस.लोढा मॅडम, कला शाखा प्रमुख डॉ.ए.एस.पाटील, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.एस.जे.जाधव, प्र.ग्रंथपाल मा.सौ.व्ही.ए.चव्हाण मॅडम उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.आर.डी.चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुस्तकप्रेमी होण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप केंद्री न होता ग्रंथप्रेमी होऊन आपले भविष्य उज्वल करण्याच्या संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यासमोर मांडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून जगभर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला जातो. अशा ग्रंथप्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी ऊर्जा घेऊन ग्रंथालयांमधून वेगवेगळ्या पुस्तकातून ज्ञानार्जन करावे. पुस्तकासाठी मुंबई येथे बाबासाहेब राजगृह ही वास्तु निर्माण केली आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांनी समाजसुधारकांचे आदर्श आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानवविद्या, संस्कृती, कायदा, संरक्षण अशा वेगवेगळ्या पैलू वर होता. त्यांनी भारतीय राज्यघटना लिहून आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचे हक्क अधिकार दिले आहेत. याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. बाबासाहेबांचे कार्य रजा, वेतन, आरक्षण, महिला प्रसुती रजा,संपत्तीमध्ये समान हक्क इ.कार्य सर्व धर्माच्या व्यक्तीचा आत्मसन्मान वाढवून देण्यासाठी मोलाचे आहेत याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.सचिन कसबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.संदीप खिलारे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल सौ. वंदना चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS