प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन स...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन सन 2022- 23 चे जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड मानांकन विज्ञान प्रदर्शन दिनांक 12 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान नेताजी सुभाषचंद्र सैनिकी स्कूल फुलगाव ता. हवेली आयोजित केले असून त्याचे उद्घाटन पुणे विद्यापीठ जीवशास्त्र प्रमुख प्रा. दिगंबर मोकाट, मुख्यनिरीक्षक एन आय.एफ. अहमदाबाद डॉ. अनंत गुप्ता व शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना शिक्षणाधिकारी डॉ. कारेकर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी व भावी वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे परंतु विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर करताना त्याची पुनरावृत्ती न करता त्यामध्ये नावीन्यता व वैशिष्ट्यपूर्ण बदल करून प्रकल्पाची दर्जेदार मांडणी करावी असे त्यांनी सूचित केले.
मनोगतामध्ये बोलताना दिगंबर मोकाट म्हणाले की कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सूक्ष्मजीवांचा अधिक प्रभाविपने वापर कसा करता येईल यासाठी संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. सदर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पुणे विद्यापीठ जीवशास्त्र प्रमुख प्रा. दिगंबर मोकाट,रसायनशास्त्र विभागचे बाळाप्रसाद अंकमवार, मुख्यनिरीक्षक एन आय.एफ. अहमदाबाद डॉ. अनंत गुप्ता, उपशिक्षणाधिकारी छाया महिंद्रकर, प्राचार्य अमर शिरसागर, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाड, सचिव रावसाहेब चौधरी, जिल्हा गणित संघाचे अध्यक्ष देविदास शिंदे, सचिव सचिन घनवट आदींसह पुणे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर जिल्हास्तरीय इन्स्पायर मानांकन विज्ञान प्रदर्शनामध्ये पुणे, पालघर, ठाणे, रायगड आदी जिल्ह्यातील 194 प्रकल्प सहभागी झाले. सदर विज्ञान प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी भेट दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रंचालन अनिल साकोरे यांनी तर आभार छाया महिंद्रकर यांनी मानले.
COMMENTS