प्रतिनिधी : नवनाथ मोरे पुणे, दि. ११ : गेल्या काही काळापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हाणामारीच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे विद्य...
प्रतिनिधी : नवनाथ मोरे
पुणे, दि. ११ : गेल्या काही काळापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हाणामारीच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे विद्यापीठ सातत्याने चर्चेत आहे. नुकतेच एका विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने कुलगुरूंकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एस एफ आय ने म्हटले आहे की, दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी जुनेद नावाच्या विद्यार्थ्याला विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरून येऊन धर्माच्या नावावरून मारहाण केली. हा पूर्णपणे मॉब लिंचिंग चा प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपासून विशिष्ट पक्ष आणि संघटनांची लोक विद्यापीठांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. आणि आता धर्माच्या नावावरून अल्पसंख्यांक मुलाला मारहाण करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न विद्यापीठांमध्ये निर्माण झालेला असल्याचे एसएफआय ने म्हटले आहे.
तसेच या सगळ्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालून ढासळलेली सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, विद्यापीठामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंडांवर विद्यापीठाने तात्काळ कायदेशीर कारवाई कारवाई करून, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि संविधानिक अधिकार यांचे जतन करावे, अशि मागणी एसएफआय ने कुलगुरूंकडे केली आहे.
निवेदन देतेवेळी एसएफआय चे शहर सचिव अभिषेक शिंदे, आकाश लोणकर, भार्गवी लाटकर, ऋषीकेश शिंदे, मंगेश गाडेकर, अनिकेत शिंदे, स्नेहल शिरसे आदी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS