प्रतिनिधी : शितल भगत *जुन्नर,ता. १०:* कुमशेत ( ता .जुन्नर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज चिमणी संवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन चिम...
प्रतिनिधी : शितल भगत
*जुन्नर,ता. १०:* कुमशेत ( ता .जुन्नर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज चिमणी संवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन चिमुकल्या १ ते ४ थी च्या जि . प. प्राथमिक शाळा कुमशेत येथील विद्यार्थ्यांनी कडकत्या उन्हाची जाणीव लक्षात घेऊन आज पुठ्यांचा वापर करून अतिशय सुरेख अशी पक्षांसाठी घरे बनवली . यात त्यांनी चिमण्यांसाठी धान्य आणि पाण्यासाठी ही व्यवस्था केली गेली . त्याचबरोबर त्यांचे मुख्याध्यापक - यश घोडे सर आणि वर्गशिक्षक श्याम सर यांनी त्यांना मार्गदर्शन व मदत केली . नव्हे नव्हे तर उत्तम असे नाटक ही चिमणी ची भूमिका बजावून विद्यार्थ्यांनी सादर केले.
*" पक्षी जगवा पक्षी वाचवा"* हा संदेश या उपक्रमातून दिला गेला. विद्यार्थ्यांनी शाळा तसेच घरी देखील कृत्रिम घरटे बनवली .यातून विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी दया निर्माण झाली. पक्षांविषयी जागृती पक्षी संवर्धन निर्माण केले.
COMMENTS