जुन्नर ( नवनाथ मोरे ) : केवाडी (ता. जुन्नर) येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. यमुना संतो...
जुन्नर ( नवनाथ मोरे ) : केवाडी (ता. जुन्नर) येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. यमुना संतोष लांडे, वय-27 वर्षे रा.केवाडी ता. जुन्नर जि.पुणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
मृत यमुनाचे चुलत भाऊ, समीर शिवाजी सांगडे (रा.हडसर ता. जुन्नर जि. पुणे) यांनी सासरच्या व्यक्तींविरोधात जुन्नर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मृतचे पती संतोष बबन लांडे, सासरे बबन हरिभाऊ लांडे, सासु चांगुना बबन लांडे (सर्व रा. केवाडी ता. जुन्नर जि. पुणे) यांच्या विरोधात भा.द.वि. कलम - 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, मृत ला मुलबाळ होत नसल्याचे कारणावरुन तिचे पती संतोष बबन लांडे, सासरे बबन हरिभाऊ लांडे, सासु चांगुना बबन लांडे सर्व रा. केवाडी ता. जुन्नर जि. पुणे यांनी यमुना संतोष लांडे हिचा शारिरीक व मानसीक त्रास देवून, तिचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने माणिकडोह धरणामध्ये वेताळबुवा मंदिरा जवळ पाण्यात उडी मारुन जीव दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सई घाटगे करत आहेत.
COMMENTS