सावित्रीबाईं फुले यांचे कार्य आपण पुढे नेले पाहिजे कल्याण : सावित्रीबाईं फुले या भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ आणि कवियत्री होत्या भ...
सावित्रीबाईं फुले यांचे कार्य आपण पुढे नेले पाहिजे कल्याण : सावित्रीबाईं फुले या भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ आणि कवियत्री होत्या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात आपले पति म ज्योतिराव फुले यांच्या सोबत साथ देवून जे कार्य केले त्यामुळेच आज आपण सावित्रीच्या लेकी अभिमानाने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत आहोत म्हणूनच सर्व भगिनींनी सावित्रीबाईं फुले यांचे कार्य आपण सर्वांनी पुढे नेले पाहिजे सावित्रीबाईं फुले यांच्या स्मृति दिना निमित्ताने कल्याण (प)येथे श्री सावता माळी मंडळ कल्याण यांच्या वतीने अभिवादन करतांना सौ प्रभावती डोंगरे कल्याणी जगताप. उज्वला डोके या महिलांनी आपले विचार मांडले.
सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती मंदा ताम्हाणे संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल थोरात साहेब यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वृत्तपत्र लेखक श्री सुदाम गाडेकर या प्रसंगी सत्यशोधक व म फुले यांचे सहकारी भाऊ कोंडाजी डुंबरे यांच्या स्मृतिदिना निमित्ताने त्यांना अभिवादन केले म फुले व सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे यांनी ओतूर जि पुणे येथे शाळा सुरू केली आहे त्याला शंभर वर्षे होवून गेलीत आजही ती शाळा अस्तित्वात आहे त्या शाळेस सर्व सभासदांनी प्रत्यक्ष भेट दयावी व तेथून प्रेरणा घेऊन सामाजिक समतेचे कार्य तेवत ठेवावे अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव डोंगरे यांनी केले म फुले यांचे कार्य व संस्थेचे कार्य आपण एका विचाराने बांधले गेलो पाहिजे आभार मच्छिंद्र डोके यांनी मानले.
या प्रसंगी विठ्ठल घोडेकर रविंद्र चौधरी विक्रम बटवाल ॲड अंकीत पिंगळे नवनीत गायकवाड अरूणभाऊ चौधरी लोखंडे साहेब जगताप बंधू विदया चौधरी वनिता मेहेर सुरेखा बटवाल कल्याणी जगताप उषा चौधरी शोभाताई थोरात इ मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS