प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर आर्वी पिंपळगाव दि ५ मार्च जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील धनश्री (चंदा) यांनी पती धनंजय तुकाराम वर्ह...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट सर
आर्वी पिंपळगाव दि ५ मार्च
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील धनश्री (चंदा) यांनी पती धनंजय तुकाराम वर्हाडी यांनी ऊभयता हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी ३५०० किलोमीटर ची सातपुडा पर्वत रांगांतुन निबीड घनदाट अरण्यातुन , हिंस्र श्वापदांचा मुक्त वावर आणि एका बाजूला उंच डोंगर तर दुसरीकडे खोल दरी असा खाच खळग्यांच्या वाटेने नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आपल्या गावी आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे मनोभावे स्वागत केले आणि संपूर्ण गावातुन मिरवणूक काढून स्वागत केले.
संध्याकाळी कन्याभोजन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करुन या दांपत्याने ही यात्रा पुर्ण केल्याबद्दल सत्कार केला.
आपल्या नर्मदा परिक्रमा यात्रेबाबत सांगताना धनश्री वर्हाडी व धनंजय वर्हाडी यांनी बदलापूर चे मौनीबांबांच्या आशिर्वादाने आणि मनाची तयारी करून नर्मदामाई च्या पाठबळावर अनेक अडी अडचणींवर मात करून ही यात्रा पार पाडता आल्याने जन्म सार्थकी लागल्याचे समाधान व्यक्त केले.निबिड अरण्यात मोरांचे थवे, हिंस्र श्वापदे , पिण्याचे पाण्यासाठी झरे, नदी,हापसे यांचे पाण्यावर व माधुकरी मागुन पोटपूजा केली पण आजारी पडलो नाही. अनेक ठिकाणी असलेल्या आश्रम, छोट्या मंदिरात मिळणारा सदाभात म्हणून मिळणारा गहुपीठ, बटाटे हा आहार ही घ्यावा लागला, प्रत्येक दिवशी चाळीस पन्नास किलोमीटर चालताना प्रसंगी चुकामुक ही झाली,मांधाता पर्वत परिक्रमा पण पुर्ण केली. माता नर्मदेच्या आशिर्वादाने यात्रा सफल झाल्याचे आवर्जून सांगितले.
धनश्री वर्हाडी यांचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथील वर्गमित्रांबरोबर प्रा.अनिल निघोट आणि प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख यांनी स्वागत केले.
पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच माधुरी वर्हाडी, उपसरपंच सोपान खांडगे,राकेश चव्हाण, पोलिस पाटील ऊद्धव वर्हाडी, रामदास चव्हाण, संजय वर्हाडी,किरण वर्हाडी,लता भागवत,सुरज वर्हाडी , विश्वास फुलसुंदर यांनी त्यांच्या स्वागताचे नियोजन केले,त्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS