आंबेगाव तालुका मध्ये गोरगरीब जनतेची जाणीवपूर्वक फसवणूक करून जनतेची पिळवणूक होत आहे. मौजे साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावी वंचित बहु...
आंबेगाव तालुका मध्ये गोरगरीब जनतेची जाणीवपूर्वक फसवणूक करून जनतेची पिळवणूक होत आहे. मौजे साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावी वंचित बहुजन महिला आघाडीचे (तालुका संघटक) शितलाताई मोरे यांचे वडिल बारसू नागू मोरे ९० वय असताना वयोवृद्ध यांची भूमि अभिलेख यांनी केली जाणीवपूर्वक फसवणूक.
भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयातील शिरस्तदोर यांनी 'क' प्रत (ब) मोजणी दारास न देता त्रायस्त व्यक्तीस कायद्याचं उल्लंघन करून जाणीवपूर्वक 'क' प्रत (ब) दिली आहे. याचा चुकीचा परिणाम असा झाला आहे की दिलेल्या प्रत नुसार काही लोकांचे चुकीच्या जागेत घर बांधले असताना त्यांचे घरकुल मंजूर होऊन त्यांचे चेक निघाले आहे व संपूर्ण भूमी अभिलेख यांचा भोंगळा कारभार झाले असून,उप अधीक्षक जे. सी.साळवे यांनी चूक मान्य सुद्धा केले. व सांगण्यात आले की "क" प्रत देण्यात आली परंतु आम्ही ती "क" प्रत पुन्हा मागून घेतली.
घोडेगाव पोलीस ठाणे चे किरण कारभारी भालेकर साहेब(सहा पोलिस निरक्षक), यांच्याशी चर्चा करून त्यांच्या देखील लक्षात येऊन त्यांनी आश्वासन दिले की भूमी अभिलेख पुणे जिल्हा अधीक्षक यांनी सखोल चौकशी करून आम्हाला ऑर्डर द्यावी आम्ही चुकीच्या झालेल्या संदर्भात अटक करण्यास तयार आहोत, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले व ,सदर जाणीवपूर्वक चुकीची मोजणी करून 'क' प्रत (ब) त्रस्त इसमास देण्यावर फौजदारी करावी ही मोजणी राजकीय हेतूने वाद विवाद निर्माण केल्याचा प्रयत्न असल्याने सदर मोजणी रद्द करून पुन्हा गट १ ते ३ ची योग्य रीतीने मोजणी करावी, अन्यथा असं न झाल्यास वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका च्या वतीने लवकरात लवकर भूमी अभिलेख आंबेगाव च्या कार्यालयावर "जन आक्रोश आंदोलन" छेडण्यात येईल ही आपण नोंद घ्यावी. असे वक्तव्य पंकज भाऊ सरोदे, तालुका उपाध्यक्ष यांनी केले व उपस्थित असलेले कार्यकारणी पुढील प्रमाणे : संगीता ताई मिरके (महिला आघाडी तालुका अध्यक्षा), शितलाताई मोरे (महिला आघाडी तालुका संघटक), पंकज भाऊ सरोदे (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), सुरेश दादा रोकडे (आंबेगाव तालुका सचिव), नफिस भाई शेख (आंबेगाव तालुका संघटक), अनिल भाऊ गायकवाड (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), उत्तम भाऊ वाघमारे (तालुका सचिव), संभाजी राजे राजगुरू (तालुका सचिव), विक्रांत भाऊ अल्हट, मंगेश रामदास राठोड, शंकर शिंदे, रामदास लोखंडे, रवींद्र सर्जेने, राहुल शिंदे, विशाल भालेराव, अक्षय वायाळ, संदीप मिरके, हरिश्चंद्र रमेश प्रजापती, राहुल रामचंद्र लोंढे, गणेश कैलास पिंगळे, शांताराम दशरथ गुंजाळ, आसिफ अजित शेख, आकाश शिंदे, विशाल भालेराव, राहुल सुभाष शिंदे, संतोष दशरथ गुंजाळ, मंगेश रामदास राठोड, रवींद्र रोहिदास सर्जिने वायाळ, तुकाराम अक्षय शंकर मच्छिंद्र शिंदे,व प्रदीप गौतम साळवे (वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन-निरीक्षक) व आंबेगाव तालुक्यातील सर्व कार्यकारणी उपस्थित होते.
COMMENTS