संपादिका : प्रतिभा किर्तीकर्वे. पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिम्मित " अविरत काव्य लेखन करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान म्हणजेच ...
संपादिका : प्रतिभा किर्तीकर्वे.
पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिम्मित " अविरत काव्य लेखन करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान म्हणजेच "ती"चा सन्मान सोहळा करण्यात आला. त्यात सन्मानीय ललिता सबनीस, प्रिया दामले, शामला पंडित (दीक्षित), वाणी ताकवणे, प्रतिमा काळे, राजश्री वाणी मराठे, योगिता कोठेकर, रागिणी जोशी, रेवती साळुंखे, प्रतिभा किर्तीकर्वे, मीना खडतरे, प्रांजल वाघ, साक्षी थोरात, श्वेता बरकडे
अंगारकी मांडे, पल्लवी पवार बावरी या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. यांचा सन्मान काव्ययोग काव्य संस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे, राजयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव पुंडे तसेच पी.पी.म्युझिक चे संस्थापक ग्रामीण कवी श्रीराम घडे सर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्त्रीचा सन्मान म्हणजे तिच्या अस्तित्वाचा, तिच्या जिद्दीचा, तिच्या कार्याचा, तिच्या अविरत लेखणीचा हा सन्मान म्हणजे तिच्या आतल्या भावना व्यक्त करण्याचा होता.
खरचं यात १६ स्त्रियांना सन्मान करण्यात आला.
या मुळे त्यांना लिहिण्यासाठी एक प्रचिती मिळते.
त्यामुळे लिखाणाला बळ मिळते. त्यामुळेच ह्या काव्योग संस्थेने तसेच राजयुवा प्रतिष्ठानने घेतलेला सर्वात सुंदर उपक्रम.
यातील प्रत्येक सन्माननीय स्त्रियांनी आपले विचार व्यक्त केले आणि आपल्या कविता सादर केल्या.
हा सन्मान सोहळा अगदी आनंदाने पार पडला.
COMMENTS