आंतरराष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून छोटेखानी बाल सभा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी गणित पेटीमधील गणित साहित्य हाताळले शालेय परिसरातील वेगव...
आंतरराष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून छोटेखानी बाल सभा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी गणित पेटीमधील गणित साहित्य हाताळले शालेय परिसरातील वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू,बिया संग्रहीत केल्या.वेगवेगळे भौमितिक आकार तयार केले, बोटाने,पट्टीने अंतर मोजले,बाटल्यांमधील पाणी मोजले
दैनंदिन व्यवहारात गणिताच्या गंमती जंमती अनुभव सांगितले.
सर्व विद्यार्थ्यांनी गणिताच्या खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
भौगोलिक आकत्या काढल्या, मातीपासून वेगळे आकार बनवले, झाडावर चढणे उतरणे, मोजमाप कृती केल्या.
पहिलीतील विद्यार्थ्यांनी जमिनीवर आकार व बियांपासून अंक बनवले
दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त पाढ्यांचे गायन केले
तिसरीच्या विद्यार्थ्यांनी अंकाचे गाणे सादर केले अंकाची गंमत सांगितली .
चौथीच्या विद्यार्थीनी दैनंदिन जीवनातील गणितीय व्यवहारिक बाल नाटिका सादर केली.
श्याम लोलापोड सरांनी गणिताच्या शाखा व नियम,सुत्रे युक्त्या, क्लुप्त्या सांगितल्या
मुख्याध्यापक कविवर्य यशवंत घोडे सरांनी गणिताचा इतिहास,रहस्ये व भाषा,गणित शास्त्रज्ञांविषयी माहिती सांगितली , गणित जीवनाचे हि स्वरचित कविता कृतीयुकत पणे सादर केली.
गणित दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणितीय व खगोलीय दृष्टिकोन निर्माण झाला. मनोरंजक पद्धतीने गणित विषय हाताळल्याने ज्ञान रचना वाद आनंद दायी पद्धतीचा अवलंब केल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला, सर्जनशीलता, जिज्ञासा वाढली,गणिता विषयी भिती दूर झाली. शालेय गणित मंडळ तयार केले ,कुतूहल निर्माण झाले, भविष्यवेधी शिक्षणाचा उद्देश समजला.
या बालसभेत अध्यक्ष स्थानी साई महेश डोके होता ,सुत्रसंचलन आराध्या भास्कर हिने केले.तर शेवटी रिया दुधाळ हिनेआभार मानले.
COMMENTS