प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) राजुरी (ता.जुन्नर) येथील ॲडव्होकेट सुजाता प्रदिप गाडेकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय विधी व न्याय मंत्...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
राजुरी (ता.जुन्नर) येथील ॲडव्होकेट सुजाता प्रदिप गाडेकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय विधी व न्याय मंत्रालया मार्फत नोटरी पदी नुकतीच नियुक्ती झाली.
ॲडव्होकेट गाडेकर या गेली १३ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत असून जुन्नर,खेड,शिवाजीनगर,पारनेर,शिरूर,अहमदनगर,संगमनेर तसेच कल्याण आदी कोर्टामध्ये विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे हाताळत आहेत.जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत.स्त्रियांविषयीच्या समस्या,कौटुंबिक हिंसाचार,जमीनविषयक वाद तसेच दिवाणी व फौजदारी,महसुली यांसारख्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत न्याय मिळवून दिलेला आहे.कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत अनेक ठिकाणी त्यांनी मार्गदर्शनपर व्याख्याने देखील दिलेली आहेत.शरदचंद्र पतसंस्था राजुरी या ठिकाणी सध्या कायदेविषयक सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक साक्षरता यावी यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रमांमध्ये ॲडव्होकेट गाडेकर यांचा सक्रिय सहभाग असतो.
सन २०२३ मध्ये या पदांकरिता ऑनलाइन स्वरूपात मुलाखत घेण्यात आली होती व मार्च २०२४ मध्ये केंद्रीय विधी व न्याय विभागामार्फत ॲडव्होकेट सुजाता गाडेकर यांची नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली.शासकीय,निमशासकीय,खाजगी,सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा कॉलेज यांना लागणारी नोटरी विषयक आवश्यक ती सर्व कामे तसेच राजुरी व परिसरातील सामान्यांची नोटरीविषयक कामे ॲडव्होकेट गाडेकर यांच्यामार्फत सोईस्कर रित्या होतील असे यावेळी राजुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊलीशेठ शेळके म्हणाले.
सदर निवडी बाबत ॲडव्होकेट सुजाता गाडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल ताई शेळके,पंचायत समिती चे माजी सभापती दिपक शेठ औटी,राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे,उपसरपंच माऊलीशेठ शेळके,माजी सरपंच एकनाथ शिंदे,शरदचंद्र पतसंस्थेचे अध्यक्ष एम डी घंगाळे साहेब,विद्या विकास मंदिर राजुरी चे मुख्याध्यापक जी के औटी सर,तंटा मुक्ती माजी अध्यक्ष संदीप औटी,गणेश हाडवळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच राजुरी आणि परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीने ॲडव्होकेट सुजाता गाडेकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
COMMENTS