बोतार्डे – जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे येथे गुरूवार दिनांक ७ मार्च २०२४ महाशिवरात्रीनिमित्त अडिच दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह...
बोतार्डे – जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे येथे गुरूवार दिनांक ७ मार्च २०२४ महाशिवरात्रीनिमित्त अडिच दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे, या सप्ताहाचे ३० वे वर्ष सुरू आहे, दैनिक कार्यक्रम काकड आरती पहाटे ४ ते ६ सकाळी प्रवचण ९ ते १० दुपारी, नेमाचे भजन ४ ते ५ सायंकाळी हरिपाठ ६ ते रात्री ७ ते ९ हरिकिर्तन यावेळी पार पडत आहेत, पहिल्या दिवसाची किर्तनसेवा महेंद्र महाराज नलवडे ( आळंदी ), शुक्रवार ह. भ. प. रामकृष्ण महाराज चौधरी ( शिर्डी ), शनिवार ह. भ. प. भरत महाराज थोरात ( खेड ) यांचे काल्याचे किर्तन होईल, शुक्रवार महाशिवरात्रीनिमित्त दुपारी १२ ते ३ मुक्तादेवी भजनी मंडळ देवळे गावठाण यांचे भजन आयोजित केले आहे. परिसरातून भाविक भक्त यांची बोतार्डे महादेव मंदिर येथे दर्शनासाठी लोकं येत आहेत. या सप्ताहानिमित्त व्यवस्थापक समस्थ ग्रामस्थ मंडळ, मौजे. बोतार्डे, दत्तमंदीर, जनसेवा आदिवासी नवतरूण मंडळ, गवळीश्वर तरूण मंडळ, आमलेवाडी, सर्व महिला बचत गट बोतार्डे व मुंबईकर, पुणेकर मंडळी ता. जुन्नर जि. पुणे. सर्वांचे बहुमुल्य सहकार्य लाभले आहे.
सर्व देणगीदार व वर्गणीदार यांचेदेखील कमिटीच्या वतीने आभार.
COMMENTS