प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत जुन्नर तालुकास्तरीय पश्चिम आदिवासी भागातील असणारी एक...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत जुन्नर तालुकास्तरीय पश्चिम आदिवासी भागातील असणारी एकमेव शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,उच्छिल यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वच ठिकाणी विशेष कौतुक केले जात आहे या स्पर्धेत सहभागी होऊन एक लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल सर्व पश्चिम आदिवासी भागातून शाळेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. शाळेला गावचा आधार, गावाला शाळेचा अभिमान
फक्त देखावा नाही तर गुणवत्तेची हमी व सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविणे हा एकमेव ध्यास तसेच अधिकाऱ्यांचे पाठबळ, पदाधिकाऱ्यांचे बळ, शालेय व्यवस्थापनचे मार्गदर्शन, शिक्षकांचे दिशादर्शक कार्य आणि विद्यार्थ्यांचे बळ हेच खरे कष्टाचे फळ ...! यामुळे हा गौरव सन्मान सोहळा प्राप्त झाला आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातंर्गत परीक्षण तालुका तपासणी पथकाचे प्रमुख हेमंत गरिबे (उ.श्रे.) गटविकास अधिकारी पंचायत समिती,सौ.अनिता शिंदे गटशिक्षणाधिकारी पं.स.जुन्नर, सौ.संचिता अभंग शिक्षण विस्तार अधिकारी बीट आपटाळे, तालुका तपासणी पथक सदस्य केंद्रप्रमुख संजय जाधव,बाळासाहेब भालेकर,स्वप्नजा मोरे व विषयतज्ज्ञ जयश्री मुंढे यांनी तपासणी करून शालेय सर्व बाबींसाठी शाळेचे कौतुक केले . मार्गदर्शन उच्छिलच्या केंद्रप्रमुख सौ.पुष्पलता पानसरे यांनी केले, यानिमित्ताने विशेष परिश्रम शाळेचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल श्री. अन्वर सय्यद, पदवीधर शिक्षक श्री.सुभाष मोहरे उपशिक्षिका सौ.स्मिता ढोबळे, सौ. आरती मोहरे व सौ. लिलावती नांगरे यांचे लाभले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन नवले, उपाध्यक्ष सागर बगाड शिक्षणतज्ज्ञ सदस्य जयराम नवले ग्रामपंचायत सदस्य शंकर आढारी,सदस्य पांडूरंग भालेराव, रविंद्र भालेराव,सुभाष बांबळे, संतोष शिंदे तर सदस्या सौ.सविता आढारी,सौ.रेश्मा केंगले, सौ. वर्षा नवले, सौ. कांचन नवले व सौ. राणी नवले यांचेही अनमोल सहकार्य लाभले आहे.शाळेचे माता पालक संघ समिती,शिक्षक पालक संघ, माजी विद्यार्थी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच सर्व गावातील सन्माननीय मान्यवर तरुण मंडळ पालक वर्ग आणि शालेय व्यवस्थापन समिती सर्व माजी व अध्यक्ष शरद नवले, दत्तात्रय भालेराव,जगदिश नवले, उपाध्यक्ष गणपत भालेराव, रंजना नवले, दिनेश केंगले सावकार नवले सर्व सदस्य रामदास नवले, संपत नवले, आर्चना शिंदे,सविता नवले, तसेच गावचे पोलिस पाटील सुनिल बगाड, उच्छिल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश आढारी, उपसरपंच मारुती खिलारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य दशरथ नवले गावचे जेष्ठ मान्यवर पांडूरंग नवले, जयकर नवले, बबन केंगले, लक्ष्मण बगाड,गुलाब आढारी, बापू नवले, हरिभाऊ शिंदे, आत्माराम शिंदे, सुदाम नवले, विष्णू नवले, गणपत बांबळे, बबनशेठ नवले आदी मान्यवर उच्छिल या सर्वांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधेत वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तसेच सातत्यपूर्ण सर्वकष शिक्षण मिळावे, या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या हे अभियान सुरू केले असून या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान तालुका व जिल्हा पातळीवर उपक्रमाच्या निकषाप्रमाणे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे माहे फेब्रुवारीपर्यंत मुल्यांकन करण्यात आले.
उच्छिल शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे. , ग्रंथालय, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, शिष्यवृत्ती परिक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणे, विद्यार्थ्यांचे बौध्दिक क्षमता वाढावी, या दृष्टीकोनातून स्पर्धा परीक्षा घेणे यासह अनेक बाबींचा समावेश करण्यात आला होता. शैक्षणिक सत्रात ज्या शाळा उपक्रमाच्या निकषानुरूप काम करीत आहेत. त्या शाळांचे मुल्यांकन करून निवड केली आहे
शाळेमध्ये या माध्यमातून शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तीमत्त्व विकास, शालेय इमारत परिसर भौतिक सोयी सुविधायुक्त, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन, कला- क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन, पालक व ग्रामस्थ आणि विविध सेवाभावी संस्था यांचे अनमोल सहकार्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकासाभिमुख विविध उपक्रम, माजी विद्यार्थी संघाचा शालेय प्रगतीत योगदान, तंबाकूमुक्त शाळा, प्लॉस्टिक मुक्त शाळा, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये गेली पाच वर्ष शाळा अग्रेसर राहिली आहे. या करीता अगदी प्रामाणिक सेवा स्वयपाकी सौ.विमल करवंदे व मदतनीस म्हणून श्रीम.नूतन साबळे हे काम पाहत आहेत.
आतापर्यंत गतकाळात जिल्हास्तरावर कबड्डी व लोकनृत्य स्पर्धेच्या निमित्ताने दोन वेळा सुवर्ण संधीचा लाभ, तालुकास्तरावर लोकनृत्य प्रथम क्रमांकाचे मानकरी,शिवजयंती महोत्सवात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तालुकास्तर प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धा भरीव कामगिरी तर केंद्र व बीटस्तरीय विविध प्रकारच्या स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन, समग्र शिक्षा अभियान जिल्हा नियोजन समिती व विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम यांच्या अध्यक्षा सौ स्नेहल चोरडिया या सर्वांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक व सर्वांगिण विकास झाला असून पश्चिम भागातून एक आदर्श शाळा डिझिटल शाळा सर्व सोयी सुविधायुक्त निर्माण झाली आहे.
शाळेची स्थापना ९ सप्टेंबर १९५२ रोजीची असून असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन खूप उंच भरारी घेतली आहे. २०१८ पासून विविध उपक्रमात आमुलाग्र बदल झाला आहे. यासाठी जिल्हा व तालुका आणि स्थानिक पातळीवर सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार आणि विविध सामाजिक स्तरावरील सर्व शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले आहे. या निमित्ताने शाळेत विविध सुविधा उपलब्ध आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत. गेल्या पाच वर्षात वीस लक्षाहून अधिकची कामे पूर्ण केली आहेत. स्वः मालकीची प्रशस्त जागा पुरेशा सुस्थितीत व सुसज्ज इमारती , क्रीडांगण, लोकसहभागातून आदिवासी भागात प्रथमच स्वतंत्र संगणक कक्षाची उभारणी, सुंदर परसबागेची निर्मिती व तालुकास्तरीय द्वितीय क्रमांकाचे सन २०२३ चे मानकरी, मुबलक पाणी व पाण्यासाठी विहिर व बोअरवेल सुविधा, स्वच्छ पाण्याची सुविधा, सुस्थितीतील स्वंतत्र शौचालय, बचतबॅक, बालसंसद, डिझिटल बोर्ड, ग्रंथालय कक्ष निर्मिती, शालेय फंड निर्मिती, स्मार्ट टि. व्ही. ई-लर्निंग सुविधा, स्वच्छता मॉनिटर , सेंद्रिय खत व्यवस्थापन व गांडूळ खत प्रकल्प तयार करण्यात आला असून, त्याबरोबरच हॅन्ड वॉश स्टेशन , पेव्हींग ब्लॉक, विविध स्पर्धांची तयारी, वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन, बालआनंद मेळावा, आवश्यक प्रयोगशाळा साहित्याची उपलब्धता, स्वच्छता मॉनिटर, पुरेसे क्रीडा साहित्य, वनभोजन, वर्षाविहार, शैक्षणिक सहल , विविध नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करणे, परिसर भेटी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, घन कचरा व्यवस्थापन निर्मिती, व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, स्काऊट गाईड पथक, संगीतमय परिपाठ व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शिक्षण विभागाचे विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी उच्छिल शाळेत करण्यात येत आहे.
COMMENTS