पुणे : हाऊसिंग एड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हडको) कंपनीच्या सीएसआर मधून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीम्को)मुबंई आयोजित महात्मा गा...
पुणे : हाऊसिंग एड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हडको) कंपनीच्या सीएसआर मधून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीम्को)मुबंई आयोजित महात्मा गांधी सेवा संघ संचलित पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी पिंपरी येथील दिव्यांग भवन फाउंडेशन येथे 1 व 2 मार्च आणि औंध जिल्हा रुग्णालयातील पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात 12 व 13 मार्च 2024 रोजी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 80 टक्के दिव्यांगत्व असलेल्या तीव्र दिव्यांगांना मोटाराइज्ड ई-ट्रायसिकल,40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या गरजू दिव्यांगांना व्हीलचेअर, क्रचेस,अंधासाठीची आधुनिक काठी,शिक्षण घेत असलेल्या अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट फोन,कर्णबधिर दिव्यांगांना श्रवणयंत्र इ. साधनांसाठी दिव्यांग फाउंडेशन येथे 134 तर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे 212 दिव्यांगांनी नोंदणी केली. शिबीरात तपासणी दरम्यान दिव्यांगत्व प्रमाणपत्र, (यूडीआयडी) वैश्विक ओळखपत्र, आधारकार्ड, उत्पन्न दाखला अथवा रेशन कार्ड आणि एक पासपोर्ट आकारातील फोटो तसेच अंध विद्यार्थ्यांना बोनाफाईड,ओळखपत्र व मागील वर्षाचे गुणपत्रक इ. कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह पुणे जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी शिबीरात सहभाग घेतला.
शिबीरातील नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना एका महिन्यात साधने वितरित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी सांगितले. शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके,समृद्धी कुलकर्णी,समुपदेशक हरिदास शिंदे,सहाय्यक ईश्वर चाळक यांनी विशेष प्रयत्न केले.या वेळी जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांनी सहभागी होवून साहीत्य साठी तपासणी केली या कार्यक्रमात श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप जुन्नर चे श्री. दीपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष , श्री अरूण शेरकर अध्यक्ष ,श्रीहरी नायकोडी ,विजय गाडेकर ,विजय शेळके ,रवींद्र नर्हे यासह शेकडो दिव्यांग बांधव उपस्थित होते
COMMENTS