महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्य अंतर्गत असलेले फोफसंडी हे निसर्ग रम्य निसर्ग सौंदर्याने...
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्य अंतर्गत असलेले फोफसंडी हे निसर्ग रम्य निसर्ग सौंदर्याने नटलेले अतिदुर्गम खोल दरीत डोंगर रांगांमध्ये वसलेले गाव आहे.स्वातंत्र्य पुर्व काळात पोप नावाचा संगमनेर प्रांताचा ब्रिटिश अधिकारी या गावाला भेट देण्यासाठी दर रविवारी येथे भेट देत असे त्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन गावाला फोफसंडी हे नाव पडले.या गावा जवळ दयाबाई मंदिर असून तेथे मांडवी नदीचे उगमस्थान आहे.जवळच मांडव्य ॠषींची गुहा आहे तपोभूमी आहे.हे गाव निसर्गाचे माहेर घर आहे.फेसाळणारे धबधबे,उंच कडे,शिखरे, चोहोबाजूंनी डोंगर रांगा, अनेक दऱ्या, नैसर्गिक कुंडे,चोहंडी नाना जातीची झाडे झुडपे पशु पक्षी v आकाराची टकोरी दरी, सातवाहन कालीन व्यापारी मार्ग असलेला गायदारा, नैसर्गिक नाकनळी भुयार, ऐतिहासिक पाऊल खुणा असलेली घोडचोहंड,घोडगडद नैसर्गिक रांजण खळगे कुंडे असलेले कलहीचे रान असे
खुप नैसर्गिक जैव विविधता लाभलेला गाव आहे.....
...........या गावात या गावाच्या पश्चिमेला उंच वारली कडा तेथून काही कोसांच्या अंतरावर आदिम पुराण कालीन हरिश्चंद्र किल्ला तारामती शिखर व निसर्ग सौंदर्याने नटलेला मालशेज घाट आहे.तर दक्षिण दिशेला उंच सुळके असलेला रांजणा किल्ला डोंगर वसलेला आहे तर पुर्वेकडे वाघोबा खिंड बरोडबा डोंगर व घुबडीचा उंच डोंगर रांग आहे.
*दुर्लक्षित कुंजरगड*
.....गावाच्या उत्तरेस कुंजरगड उर्फ कोंबडा किल्ला हा दुर्ग किल्ला जवळ जवळ चार हजार फूट उंचीचा असून या किल्ल्यावर शिवकालीन टाके, विविध घडीव मुर्ती अवशेष, तटबंदी, बुरुज,गुहा, निसर्ग निर्मित आरपार असलेले गुप्त भुयार आहे.ऐतिहासिक नोंदी नुसार सन १६७० मध्ये दुसऱ्या सुरत लुटी नंतर शिवाजी महाराज मावळ्यांसह १७ दिवस कुंजरगडावर वास्तव्यास होते असा उल्लेख शिवनार खैरनार यांच्या शोध कादंबरीत आढळतो.
शिवाजी महाराजांच्या काळानंतरही राघोजी भांगरे, बाळू पिचड, संताजी शेळकंदे,विठू मुठे,डामसे,कोंड्या नवले या क्रांतीवीरांचे वास्तव्य होते.
अजूनही जुनी जाणती गावातील आजुबाजुची माणसे मौखिक पणे सांगतात
पोप ब्रिटिश अधिकारी येण्याच्या अगोदर कित्येक वर्षे या किल्यावर खुप मोठा बाजार भरत होता.घोड्या गाढवांवर वाहतूक होत होती.जवळच शिवकालीन भुयारे असलेला कोंबडा डोंगर आहे , अनेक गुहा असलेला सित धार व दौंड्या डोंगर आहे.उत्तरेला खोल खाली दिसणारी अकोले तालुक्यातील तळे कोथळे,, विहीर,कोहणे,हि गावे हद्दीला लागून आहेत.या गडावर आता ७,८ वर्षांपासून महाशिवरात्र यात्रा भरते. चोहोबाजूंनी खाली तीव्र उतार व खोल नळ्या/ घळ्या/दऱ्या आहेत.या किल्ल्यावरुन सहृयाद्री रांगेतील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला,हडसर किल्ला,रांजणा किल्ला,बांगडीगड ,बरडीनाथ डोंगर,निमगिरी किल्ला, नारायणगड,वऱ्हाड्या डोंगर सुळके ठळकपणे दिसतात.तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई, आजोबा डोंगर,भैरव गड,रतन गड,दिसतात.
अकोले तालुका,जुन्नर तालुका मुरबाड तालुका परिसर दिसतो क्वचित येथे पर्यटक ट्रेकिंगसाठी येतात.पर्यटनापासून अजून ही हा किल्ला दुर्लक्षितच आहे .गडाजवळ कोणतेही वाहतुकीचे साधन येत नाही.दळणवळणासाठी रस्ता नाही.त्यामुळे
येथे भटकंती साठी येण्यासाठी खूप पायपीट करावी लागते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर मार्गे..उदापूर...मांदारणे..मुथाळणे..कोपरे..फोफसंडी हि गावे लागतात.. हे अंतर ओतूर पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे..तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ मार्गे...अबितखिंड बैरोबा .पळसुंदे किंवा.सातेवाडी.फोफसंडी..हे अंतर पंचवीस किलोमीटर आहे. फोफसंडी गावात आल्यानंतर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायी प्रवास एक ते दिड तास लागतो
तसेच कोहणे तळे मार्गे यायचे असल्यास पायवाटेने चढत कोहणधार व सितमाई धार मार्गे दोन तास चालत जावे लागते.
ऐतिहासिक वारसा लाभलेला निसर्ग संपन्न किल्ला अजूनही दुर्लक्षित आहे.
*#अपरिचित शिवकालीन मानवनिर्मित भुयारे*#
......या गडाला लागूनच उंच सुळके असलेला कोंबड्याच्या आकारासारखा डोंगर असून त्याला कोंबडा म्हणतात.
मध्यम कडा असून यावर तटबंदी चे कोणतेही अवशेष पाहायला मिळत नाही . परंतु पाहता क्षणी हा दुर्ग पाहणाऱ्याला आकर्षित करतो. पण या दुर्गात अपरिचित अद्भुत गुप्त मानव निर्मित कोरीव आकर्षक घडीव भुयारे दडलेली आहेत . साधारण पणे हि भुयारे शिवकालीन किंवा सातवाहन कालीन असावित असा अंदाज आहे.
चोहोबाजूंनी झाडी आहे.जवळच वाघोबा खिंड असून सातवाहन कालीन कानडी/ कांदडी वाघोबा वनदैवत आहे.दुर्गप्रेमी कोणीही भटकत नाही.गावतील माणसं सुध्दा तेथे जाण्यासाठी घाबरतात.क्वचित प्रसंगी उन्हाळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी भुयारातून नळी लावून काढण्यासाठी जातात. येथे चार भुयारे असून प्रसिद्धीपासून दूर आहेत.
..Y आकाराचे भुयार क्रमांक १ ..,२
या डोंगराच्या मध्यभागी पश्चिम कडील बाजूकडे हरिश्चंद्रगड व कुंजरगडाच्या दिशेला मावळतीकडे भुयाराचे तोंड आहे y आकाराचे जवळ जवळ सत्तर फूट लांबीचे व तीन फूट रुंदीचे प्राचीन इतिहास कालीन आयता कृती मानवनिर्मित कोरीव आकर्षक अद्भुत गुप्त भुयार आहे. सरळ पुढे काही अंतरावर गेल्यास मध्यभागी खाली उतरण्यास पाय ठेवण्यासाठी छोट्या चार पाच पायऱ्या आहेत.
तेथून vआकाराचे दोन मार्ग आहेत.पुढे गेल्यावर शेवटी घडीव कोरलेली महादेवाची पिंड आहे
अशाच प्रकारे.दुसऱ्या बाजूच्या भुयार शिरताना पहिल्या भुयारा प्रमाणे रचना केली आहे. मध्यभागा पासून पुढे गुडघ्या इतके पाणी लागते.शेवटी पाण्यात तेथे पण महादेवाची पिंड मुर्ती, गणेश मूर्ती आहे.
तीन व चार भुयारे डोंगरात माती खाली गाडली गेलेली आहेत.दगडांनी बुजलेली आहे त
या भुयारातून आत प्रवेश करताना खूप अंधार आहे. खुप धाडस करून आत घुसावे लागते.सोबत ट्राॅर्च घेऊन जावे लागते. चार पाच माणसांसोबत जावे लागते कारण हिस्र किंवा सरपटणारे प्राणी असण्याची भिती असते.
अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी Yash Ghode fofsandikar या युटुब चॅनलला लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा व शेअर करा..
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील फोफसंडी गावातील कुंजरगड कोंबडा किल्ला या ठिकाणी भेट देण्यासाठी दोन मार्ग आहेत
अकोले..कोतूळ..फोफसंडी
ओतूर.उदापूर कोपरे मार्गे फोफसंडी.
-------------------------++------
शब्दांकन.. कविवर्य यश घोडे. फोफसंडीकर..
8975662035
COMMENTS