प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याच्या पदभार नियुक्...
प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
महिला दिनाचे औचित्य साधत शुक्रवार दिनांक ८ मार्च २०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याच्या पदभार नियुक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृती समिती, व त्यागमाता रमाई फाउंडेशन आनंद वडगाव यांच्या सहकार्याने लुंबिनी बुद्ध विहार वडगाव आनंद येथे पार पडला.
२१ महिलांच्या कार्यकारिणीत अध्यक्षस्थानी आयु.पूनम ताई गौतम दुधवडे, सरचिटणीसपदी आयु. एकता अरविंद पंडित आणि कोषाध्यक्ष म्हणून आयु.सोनाली रविंद्र शिंदे यांची निवड भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम चे वतीने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम चे महिला अध्यक्ष आयु. प्रभाताई केदारी ह्या होत्या.
तर प्रमुख उपस्थिती मध्ये भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम चे संस्कार सचिव आयु. अतिश उघडे, पर्यटन सचिव आयु. अरविंद पंडित, ऑडिटर आयु.रविंद्र अभंग भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आयु.राकेश डोळस, सरचिटणीस संजय धोत्रे, कोषाध्यक्ष आयु.चंद्रकांत, जावळे गुरुजी, संस्कार उपाध्यक्ष आयु. नितीन साळवे,पर्यटन सचिव आयु.विजय वाघमारे, संघटक यशवंत गायकवाड, आदी मान्यवरांसह आयु.संदेश काशिकेदार आयु.रंजना काशिकेदार
आयु.सुरेश लोखंडे, आयु.गौतम सोनवणे व बहुसंख्य बंधू भगिनी उपस्थित होते.
या प्रसंगी त्याग मूर्ती रमाई फाउंडेशन चे वतीने विधवा महिलांना साडी वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला.
जयमाला गौतम सोनवणे यांनी भोजन दान दिले.
COMMENTS