प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे पारंपारीक पद्धतीने व मोठ्या उत्साहात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथील श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यानिमित्त श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. यानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेस बैलगाडा शर्यतीचे मोठे आकर्षण असते. दिवसभर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. गणेश जयंतीनिमित्त मंदीरात देवस्थानचे वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हि महाआरती बाळासाहेब कुर्हाडे, प्रशांत थोरात, मनोहर भालेराव, संदीप बोचरे, व ॲड. विवेक खत्री या मान्यवरांचे हस्ते विधीवत अभिषेक करुन करण्यात आली तसेच देवस्थानचे वतीने या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सकाळी १० ते १२ या दरम्यान मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले. श्री गणेश जन्म सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला. त्यानंतर भाविक भक्तांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, विजय वर्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, कैलास लोखंडे, जितेंद्र बिडवई, देवस्थानचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंतीनिमित्त गोळेगाव ग्रामस्थांचेवतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला दिवसभर बैलगाडे घाट चालु होता. याचा असंख्य बैलगाडा शौकीनांनी आंनद घेतला. तसेच देवस्थान ट्रस्ट व आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास भाविक व नागरीकांकडुन चांगला प्रतीसाद मिळाला. आलेल्या भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा व सुविधा पुरवण्यात आल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बु. येथील आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आलेल्या भाविकांना वैद्यकीय सेवा व सुविधा पुरविल्या. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे दिली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त बुधवार दि.७ फेब्रुवारी ते बुधवार दि.१४ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी श्री गणेश जयंतीनिमित्त श्रींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा
मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे पारंपारीक पद्धतीने व मोठ्या उत्साहात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथील श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यानिमित्त श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. यानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात मोठी यात्रा भरते.
या यात्रेस बैलगाडा शर्यतीचे मोठे आकर्षण असते. दिवसभर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. गणेश जयंतीनिमित्त मंदीरात देवस्थानचे वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हि महाआरती बाळासाहेब कुर्हाडे, प्रशांत थोरात, मनोहर भालेराव, संदीप बोचरे, व ॲड. विवेक खत्री या मान्यवरांचे हस्ते विधीवत अभिषेक करुन करण्यात आली तसेच देवस्थानचे वतीने या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सकाळी १० ते १२ या दरम्यान मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले. श्री गणेश जन्म सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला. त्यानंतर भाविक भक्तांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, विजय वर्हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, कैलास लोखंडे, जितेंद्र बिडवई, देवस्थानचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंतीनिमित्त गोळेगाव ग्रामस्थांचेवतीने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यात पंचक्रोशीतील बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला दिवसभर बैलगाडे घाट चालु होता. याचा असंख्य बैलगाडा शौकीनांनी आंनद घेतला. तसेच देवस्थान ट्रस्ट व आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास भाविक व नागरीकांकडुन चांगला प्रतीसाद मिळाला. आलेल्या भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा व सुविधा पुरवण्यात आल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बु. येथील आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आलेल्या भाविकांना वैद्यकीय सेवा व सुविधा पुरविल्या. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे दिली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त बुधवार दि.७ फेब्रुवारी ते बुधवार दि.१४ फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
COMMENTS