प्रतिनिधी : निलेश गाडगे 'सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभलं चा जयघोष व खोबरे भंडा-याची उधळण करीत समस्त ग्रामस्थ निमगाव सावा रविवार दि...
प्रतिनिधी : निलेश गाडगे
'सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभलं चा जयघोष व खोबरे भंडा-याची उधळण करीत समस्त ग्रामस्थ निमगाव सावा रविवार दिनांक 25 फेब्रुवारी
पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलदैवत खंडोबा यात्रोत्सव माघ पौर्णिमेनिमित्ताने साजरा होत असताना उत्सवानिमित्ताने शनिवारी दिनांक 24 फेब्रुवारी देवाची विधीवत पूजा करण्यात आली,तसेच गावातून मानाची काठीची मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर मुंबई, पुणे व नगर जिल्ह्यातून आलेली भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गडावर गर्दी केली होती..
खंडोबा मंदिर परिसरात जागरण गोंधळ कार्यक्रम पहायला मिळाला.
तसेच भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन भरघोस पारितोषिक यांचे वाटप करण्यात येणार आहे.
COMMENTS