प्रतिनिधी प्रा अनिल निघोट मंचर १६ फेब्रुवारी आखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका च्या वतीने मंचर येथे रथ सप्तमी प्रवासी वाहतूक दिन धुम...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट
मंचर १६ फेब्रुवारी
आखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका च्या वतीने मंचर येथे रथ सप्तमी प्रवासी वाहतूक दिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक भोर, जिल्हा पर्यावरण प्रमुख तथा सह कोषागार श्री ज्ञानेश्वर माऊली ऊंडे तालुका संघटक श्री देविदास काळे, तालुका सचिव श्री सुदाम भालेराव सर, कृषी समिती प्रमुख अतुल इंदोरे, क्रियाशील कार्यकर्ते श्री संजय चिंचपूरे, क्रियाशील कार्यकर्ते श्री आकाश ऊंडे, उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष श्री अशोक भोर, हे होते, अध्यक्षीय भाषणात अशोक भोर म्हणाले, एस. टि. महामंडळ गरीब लोकांच्या सेवेकरिता तत्पर सेवा देताना दिसते.
वाहक, चालक, अहोरात्र मेहनत घेत आसतात,व प्रवाशांना वेळेवर घरी सोडण्याचे चोख कामगिरी एस टि महामंडळ करत आसते, श्री ज्ञानेश्वर माऊली जी ऊंडे यांनी प्रास्ताविकात मनोगत व्यक्त करताना , रथ सप्तमी च्या दिवशी प्रवासी वाहतूक दिन साजरा केला जातो, स्वर्गिय बिंदुमाधव जोशी यांनी दुरदुष्टिने विचार पुर्वक सप्तमी प्रवासी वाहतूक दिन चालु करुन वाहक, चालक, प्रवासी,व पोलिस डिपार्टमेंट, यांना न्याय देण्यासाठी ग्राहक पंचायत काम करत आली आहे, ग्राहक चळवळी खुप काही बोलण्या सारखे असुन वेळ कमी असुन नंतर बोलता येईल, सदर कार्यक्रमाचे आयोजन करुन पोलिस खात्यातील प्रमुख अधिकारी व एस टी चे आधिकारी व कर्मचारी यांचा आखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने गांधी टोपी, शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी व एस. टी. आधिकारी पोलिस अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS