प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) सावरगाव ( ता. जुन्नर ) येथे डिसेंट फाउंडेशन पुणे , आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल व ग्रामपंचायत सावरगा...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
सावरगाव ( ता. जुन्नर ) येथे डिसेंट फाउंडेशन पुणे , आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तिसऱ्यांदा संपन्न झाले.
याप्रसंगी लोकांना मार्गदर्शन करताना सावरगाव चे लोकनियुक्त सरपंच दीपक बाळसराफ म्हणाले की डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांपासून जेष्ठांपर्यंत विविध उपक्रम राबवले जातात. जुन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करणे या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातून पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलच्या मदतीने सावरगाव, लेण्याद्री, ओझर, ओतूर, कुसुर, मढ, आळेफाटा या ठिकाणी नेत्र शिबिरांचे आयोजन केले असून आत्तापर्यंत ६०० लोकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. सावरगाव येथील नेत्र शिबिरात २०३ लोकांची तपासणी करण्यात आली व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जवळपास ४२ जणांना पनवेल येथे पाठवण्यात आले. खरोखरच डिसेंट फाउंडेशन चे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.
या शिबिराच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, उपसरपंच संजीवनी हिंगे, विठ्ठलवाडी चे माजी सरपंच आदिनाथ चव्हाण, फाउंडेशनचे सचिव फकीर आतार, ग्रामपंचायत सदस्या रंजना बाळसराफ, कमल थोरात, माधवी बाळसराफ, सावरगाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता पवार,डॉक्टर अक्षय जाधवर, दिलीप कचेरे, शिवपुत्र कोळी, उमेश जाधव, नितीन बाळसराफ, विनोद सैद, योगेश वाघचौरे,आशा सेविका, आरोग्य सेविका आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी फकीर आतार यांनी केले तर प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केले व दीपक बाळसराफ यांनी आभार मानले.
COMMENTS