जुन्नर प्रतिनिधी:: दिव्यांग बांधवांच्या कार्यासाठी नेहमीच आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री राधेश्याम सशक्तीकरण...
जुन्नर प्रतिनिधी:: दिव्यांग बांधवांच्या कार्यासाठी नेहमीच आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री राधेश्याम सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य जुन्नर व सामाजिक कार्यात नेहमीच मदत करणाऱ्या स्पार्क मिंडा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कालिका माता मंगल कार्यालय जुन्नर येथे मोफत दिव्यांग जनजागृती व सशक्तीकरण शिबिराचे आयोजन बुधवार 14फेब्रुवारी 2024रोजी आयोजित करण्यात आले कार्यक्रम उद्घाटन श्री गौरवभाऊ जाधव राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य व श्री सत्यशिल दादा शेरकर चेअरमन श्री विध्नहर साखर कारखाना यांच्या व मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहिती प्रहारसेवक व श्री राधेश्याम सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक चव्हाण साहेब यांनी दिली.या शिबिरात दिव्यांग बांधवांची मोफत तपासणी करून मोफत कृतिम पाय, हात, कॅलीपर, कुबड्या, काठी, वॉकर इत्यादी साहित्यासाठी नोंदणी करण्यात येणार असून प्रत्यक्ष मोफत साहित्य 25फेब्रुवारी 2024रोजी नानेकरवाडी चाकण खेड पुणे येथे वाटप करण्यात येणार आहे. या शिबिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात स्पार्क मिंडा फाउंडेशन च्या वतीने मोफत साहित्य वाटप, दिव्यांग बांधवांसाठी मोफत युनिक कार्ड नोंदणी, जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या मार्फत युनिक कार्ड वाटप, बीज भांडवल कर्ज, उदरनिर्वाह भत्ता अर्ज वाटप व माहिती देण्यात येणार आहे.तसेच तहसील कार्यालय जुन्नर मार्फत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना,नवीन रेशन कार्ड नोंदणी केली जाणार आहे. पोस्ट ऑफिस मार्फत आधार कार्ड दुरुस्ती व आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक जोडण्यात येणार आहे. डिसेंट फाउंडेशन मार्फत वृद्धांना मोफत काठी वाटप करण्यात येणार आहे.लोकसेवा केंद्र जुन्नर यांच्या मार्फत विविध प्रकारच्या योजनांची माहिती व ऑनलाईन नोंदणी जसे ई श्रम कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड नोंदणी केली जाणार आहे. प्रथम एज्युकेशन शिरूर यांच्या मार्फत 8वी पास व पुढील 18ते 35वयोगटातील युवक युवतींना 11प्रकारचे मोफत प्रशिक्षण व 100 टक्के नोकरीची हमी देण्यात येणार आहे. राज फाउंडेशन मार्फत मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन करण्यात येणार असून खादी ग्रामोद्योग जुन्नर यांच्याकडून व्यावसायिक मार्गदर्शन व विश्वकर्मा कर्जमंजुरी नावनोंदणी केली जाणार आहे. डी वाय पाटील आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पुणे मार्फत मोफत कान, नाक,घसा तपासणी, स्री रोग तपासणी व उपचार केले जाणार आहेत. महा लॅब जुन्नर मार्फत मोफत रक्त तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक 1- श्री दीपक चव्हाण साहेब 9822267235
2- श्री अरुण शेरकर साहेब 9503179946
3- स्पार्क मिंडा फाउंडेशन 7447426191 /7447426192 या क्रमांक वरती संपर्क साधावा. तरी या सामाजिक शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन प्रहार रुग्णसेवक श्री राधेश्याम सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक चव्हाण साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले आहे.
COMMENTS