प्रतिनिधी - प्रा.अनिल निघोट वडगाव कांदळी दि ६ फेब्रुवारी. जुन्नर संगमनेर पारनेर बैलगाडा संघटना व विमा कंपनी च्या वतीने वडगाव कांदळी ता. जुन...
प्रतिनिधी - प्रा.अनिल निघोट
वडगाव कांदळी दि ६ फेब्रुवारी.
जुन्नर संगमनेर पारनेर बैलगाडा संघटना व विमा कंपनी च्या वतीने वडगाव कांदळी ता. जुन्नर येथे आयोजित ४ ते ६ फेब्रुवारी अशी तीन दिवस आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत प्रकाश भिमाजी लांडगे साहेब ११.७८ सेकंद,किशोरशेठ दांगट पिंपळवंडी यांच्या बैलगाड्याने ११.५७ सेकंद फायनल जिंकली. तर तिसऱ्या दिवशी प्रकाश लांडगे साहेब ११.८५ सेकंद सह फायनल चे मानकरी ठरले. सभापती शिवराज आव्हाळे ११.३५ सेकंद सह घाटाचा राजा ठरला.एकुण ४५० बैलगाडे स्पर्धेत सहभागी झाले. प्रथम क्रमांकात २३, द्वितीय क्रमांकात २१०, त्रुतिय क्रमांक १३९ बैलगाडे आले.
यात्रेस प्रा.सुरेखा निघोट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख महिला आघाडी आंबेगाव,प्रा.अनिल निघोट माजी तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना आंबेगाव यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या ,
त्यांचा विमा कंपनी संस्थापक प्रकाश लांडगे यांनी सत्कार केला.
यात्रेस प्रसिद्ध बैलगाडा मालक बबनशेठ दांगट, संजय गोरे चेअरमन, राहुल हांडे देशमुख, खडकी चे मा सरपंच दत्ता भोर, रामदास विश्वासराव,जानकुशेठ डावखर, बाबाजी शेटे,, किसन टाकळकर बैलगाड्यांसह उपस्थित होते.
यात्रेचे ऊत्तम नियोजन विमा कंपनी संस्थापक प्रकाश लांडगे साहेब,धोंडीभाऊ पिंगट,शरद पाचपुते, संभाजी शेटे, बाबाजी लांडगे, संतोष लांडगे यांनी केले.
COMMENTS