प्रतिनिधी सतीश शिंदे, संपादक २५ फेब्रुवारी आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात गावोगावी यात्रा सुरू असुन गावी व बाहेरगावी रहाणारे प्रेमळ, आप...
प्रतिनिधी सतीश शिंदे, संपादक
२५ फेब्रुवारी
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात गावोगावी यात्रा सुरू असुन गावी व बाहेरगावी रहाणारे प्रेमळ, आपुलकी आणि माणुसकी आणि कष्टकरी अशी वैशिष्ट्ये असलेला आदिवासी बांधव यात्रांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन पैपाहुण्यांसह विरंगुळा, मनोरंजन, दुकानदारांकडून खरेदी विक्री त मोठ्या संख्येने सहभागी होत आहे, अतीशय छोटी लोकवस्ती असलेल्या मापोली गावात कळमजाई देवीच्या यात्रेत भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले,ज्यात कुरवंडी येथील लक्ष्मण तुकाराम मते १२ पॉईंट ११ सेकंदसह घाटाचा राजा ठरला तर फायनलचा मानकरी ठरला.
यात्रेस प्रा.अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना,प्रा.सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी सभापती इंदुबाई लोहोकरे,शिवसेना विभागप्रमुख बाळासाहेब लोहोकरे,हभप अनंत लोहोकरे, यात्रा कमिटी अध्यक्ष रामचंद्र लोहोकरे,सुनील लोहोकरे निशान पंकज लोहोकरे,संभाजी लोहोकरे यांनी तर सेकंद घड्याळ राजु लोहोकरे, विलास लाडके यांनी पाहिले.यात्रेची व्यवस्था नियोजनात भिवसेन दांगट, दिगंबर गवारी,सविता लोहोकरे पोलिस पाटील,बाळासाहेब लोहोकरे,तुकाराम लोहोकरे यांचा समावेश होता.
COMMENTS