प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) जुन्नर ता 29: श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थसंकल्प ( Budget ) या विष...
प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
जुन्नर ता 29: श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थसंकल्प ( Budget ) या विषयावर पोस्टर प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अॅड. संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.डी. चौधरी यांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात देशाचे व राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित अर्थसंकल्प या विषयावरील पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा.व्ही.बी. कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.डी. चौधरी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कला शाखाप्रमुख डॉ. एस. पाटील, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. एस. जे. जाधव हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. कुलकर्णी सरांनी अर्थसंकल्पाविषयीच्या विविध कृषी ,उद्योग ,सेवा, शिक्षण , संरक्षण अशा विविध बाजू विद्यार्थ्यांना स्पष्ट केल्या. प्रामुख्याने जागतिक महामंदी नंतरच्या काळात तुटीचा अर्थसंकल्पाचे महत्त्व हे देशाच्या दृष्टिकोनातून कसे उपयुक्त आहे याची विद्यार्थ्यांना कल्पना दिली. अर्थसंकल्पातून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जेंडर बजेट ची उपयुक्तता विद्यार्थ्यांसमोर मांडली. उपप्राचार्य चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतातुन विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाविषयी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाविषयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याची उपयुक्तता त्यांनी नमूद केली. महाविद्यालयातील कार्यक्रमाबरोबरच इतर विद्यापीठ स्तरावरील व राज्यस्तरावरील विविध स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा सचिन कसबे यांनी तर सूत्रसंचालन व आभार डॉ. सुप्रिया काळे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वृंद व अर्थशास्त्र स्पेशल विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
COMMENTS