जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील तुळजा लेणी येथे पिंपरी चिंचवड येथील १३० पर्यटकांची धम्मसहल आली होती, या धम्मसहलीमध्ये तुळजा लेणी...
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील तुळजा लेणी येथे पिंपरी चिंचवड येथील १३० पर्यटकांची धम्मसहल आली होती,
या धम्मसहलीमध्ये तुळजा लेणी येथील तीन क्रमांकाच्या खोलीमध्ये हे पर्यटक ध्यानधारणेसाठी बसले असताना दुसरीकडे दुसर्या लग्नाचा ग्रुप आलेला होता, यातील काही तरूणांनी पाण्याच्या टाकीवर मधमाशा पाणी पिण्यासाठी आल्या असता त्यांनी दगड मारला व यामध्ये या मधमाशा जवळच ध्यानधारणेसाठी बसलेल्या पर्यटकांच्या दिशेकडे गेल्या व पर्यटकांवर जोरदार हल्ला केला यामध्ये १०० पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला यामध्ये ६ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत,
यावेळी तात्काळ १०८ क्रमांकावर फोन करून अॅम्बुलन्स बोलवली व जुन्नर येथील ग्रामीण रूग्णालय येथे सर्व पर्यटकांना उपचाराकरिता दाखल केले असून यातील काही पर्यटक सुस्थितीत झाले असून ६ पर्यटकांची स्थिती गंभीर स्वरूपाची असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
COMMENTS