प्रतिनिधी प्रा अनिल निघोट पनवेल दि २१ फेब्रुवारी प्रसिद्ध बैलगाडी मालक गोल्डमॅन पंढरीशेठ फडके विहीर वाले यांचे ह्रदयविकाराने निधन झाले, महार...
प्रतिनिधी प्रा अनिल निघोट
पनवेल दि २१ फेब्रुवारी
प्रसिद्ध बैलगाडी मालक गोल्डमॅन पंढरीशेठ फडके विहीर वाले यांचे ह्रदयविकाराने निधन झाले, महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटना अध्यक्ष म्हणून बैलगाडा शर्यत बंदीविरोधात त्यांनी ठोस भूमिका घेतली होती. आपला कारच्या टपावरील अफलातून डान्स, आणि महागड्या गाड्या,महागडी शर्यतीची बैलं हा त्यांचा आवडता शौक होता, महाराष्ट्रातील अनेक शर्यतीत त्यांचा बादल हा बैल प्रथम आला होता. बैलगाडा शर्यतीत ग्लॅमर मिळवून देणारे पंढरीनाथ फडके यांच्या आकस्मिक मृत्यूने बैलगाडा क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बैलगाडा मालक, शौकिन हळहळ व्यक्त करत आहेत.
COMMENTS