वडगाव सहाणी : बाल संसद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी नामनिर्देशन फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी तथा शाळेचे म...
वडगाव सहाणी : बाल संसद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी नामनिर्देशन फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र बेलवटे सर यांच्याकडे दाखल केले.ऋषिकेश बाळासाहेब शिंदे व साकीब बशीर तांबोळी या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैद्य झाले.मतदान घेण्यासाठी केंद्राध्यक्ष म्हणून राजेंद्र बेलवटे यांनी जबाबदारी पार पाडली.
मतदान अधिकारी म्हणून शाळेचे उपशिक्षक श्री बाळासाहेब बांबळे सर, अंगणवाडी सेविका सौ नीताताई वाबळे, सौ स्वातीताई तांबोळी व संध्याताई वाबळे यांनी जबाबदारी पार पाडली. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 वार गुरुवार रोजी सकाळी 11. 00 वाजता बालसंसद निवडणूक मतदान सुरु करण्यात आले.
मतदान संपन्न झाल्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीसाठी वडगाव सहानी ग्रामपंचायतचे श्री आनंदराव वाबळे व सौ आशाताई जेडगुले यांनी आपली जबाबदारी पार पाडली.मतमोजणी नंतर ऋषिकेश शिंदे याला 26 मते अधिक पडल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले. मतदान प्रक्रिया, प्रचार, मतमोजणी इत्यादी निवडणूकीसंदर्भात माहिती दिली. भारताचा भावी नागरिक हा निवडणुकी संदर्भात जागरूक झाला पाहिजे.लोकशाहीचे महत्त्व सर्वांना माहीत झाले पाहीजे. भविष्यात मतदान करताना एक जागरूक नागरिक म्हणून मतदान केले पाहिजे व योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे.मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी , शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व निवडणूक प्रक्रिया खेळमेळीच्या वातावरणात पार पडली.शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS