जुन्नर राळेगण : राळेगण येथे सर्व महिला बचत गटांच्या माध्यमातून ११ फेब्रुवारी २०२४ रोजी हळदीकुंकू व होम मिनिष्टर हा कार्यक्रम राबविण्यात आल...
जुन्नर राळेगण : राळेगण येथे सर्व महिला बचत गटांच्या माध्यमातून ११ फेब्रुवारी २०२४ रोजी हळदीकुंकू व होम मिनिष्टर हा कार्यक्रम राबविण्यात आला. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांस सुरवात झाली. यामध्ये सर्व महिला वर्गाचा बहुसंख्य असा सहभाग होता.त्यात प्रमुख पाहुणे म्हणून उषाताई अभंग शाखा व्यवस्थापक पं. स. जुन्नर व सागर ठिकेकर प्रभाग समन्वयक निरगुडे -पाडळी उपस्थित राहिले व महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच मुलांच्या अनेक ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.त्यानंतर महिला वर्गाने तळ्यात मळ्यात, फूट फूट फुगा, खादाड बिस्कीट, नादब्रम्ह,
संगीत खुर्ची, धावाधाव चेंडू, प्रश्नमंजुषा असे विविध खेळ खेळून स्पर्धकांनी दाद मिळविली. त्या खेळामध्ये दोन खेळात प्रथम क्रमांक मिळवत रोहिणीताई राजेंद्र उंडे यांनी प्रथम पैठणीचा मान मिळविला. तसेच धनश्री गायकवाड, स्वप्नाली उंडे, रसिया मुलाणी, नीलम उंडे व लहान गटात कु.वेदांत गायकवाड, आर्यन कोंदे व भाग्यश्री तळपे यांनीही इतर खेळांत बक्षीस मिळविले. शेवटी सर्व महिलांनी उखाणा घेऊन स्पर्धा कार्यक्रमाची सांगता झाली. हिरकणी ग्रामसंघ अध्यक्षा नीलमताई उंडे यांनी सर्व महिलांचे आभार मानले.
या कार्यक्रम आयोजनात सुनीता यमराज उंडे, पल्लवी वैभव गायकवाड सरपंच, सुजाता राजू उंडे, कुसुम बाजीराव उंडे, रोहिणी राजेंद्र उंडे, मंगल महेंद्र उंडे, तृप्ती संजय उंडे यांनी विशेष काळजी घेतली.
रेश्मा मयूर उंडे यांनी सर्व महिला वर्गाला भेटवस्तू वाणाची वाटप केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत उंडे, व खेळांची मांडणी रसिका खिलारी व बाजीराव उंडे यांनी केले.
तसेच मार्गदर्शनपर उत्तम नियोजन व्यवस्थेसाठी राजूपाटील उंडे व मयूरशेठ उंडे उपसरपंच यांचे विशेष सहकार्य लाभले.
COMMENTS