जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तेजूर या गावातील माणिकडोह जलाशयामध्ये मच्छिमारीसाठी गेलेले एकनाथ ठका दुधवडे वय ५२ बेपत्ता झाले होत...
जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील तेजूर या गावातील माणिकडोह जलाशयामध्ये मच्छिमारीसाठी गेलेले एकनाथ ठका दुधवडे वय ५२ बेपत्ता झाले होते, कालपासून मोठ्या युध्दपातळीवर शोधमोहिम सुरू होती, तेजूर गावच्या सरपंच अनिता जाधव व स्थानिक ग्रामस्थांनी आदिवासी वादळ देवराम लांडे यांना संपर्क साधला व सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर देवराम लांडे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर लगेचच उपविभागीय पोलिस अधिकारी चौधर साहेब व तहसिलदार सबनीस यांना संपर्क केला व तेदेखील ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले तसेच जुन्नर तालुक्यातील रेस्क्यू टिमने शोधमोहिम सुरू केली यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर साहेब व आदिवासी वादळ देवराम लांडे हे स्वत शोधमोहिमेत उतरून शोधकार्य सुरू केले व चार ते पाच तास शोध घेऊन देखील सदर व्यक्ती भेटला नाही. मात्र रात्री उशिरा ९ वाजता एकनाथ ठका दुधवडे यांचा मृतदेह रेस्क्यू टिमला अखेर सापडला रात्री २.१५ मी. वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले...
COMMENTS