प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर ) पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित "हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४" अंतर्गत जुन्नर पर्यट...
प्रतिनिधी : प्रा.प्रविण ताजणे ( सर )
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित "हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४" अंतर्गत जुन्नर पर्यटन विकास संस्था, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्राक्ष महोत्सव २०२४ चे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
वरील सर्व संस्थांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून हा द्राक्ष मोहोत्सव जुन्नर तालुक्यात होत असून, त्याचेच स्वरूप आता मोठ्या प्रमाणात हिंदवी स्वराज्य महोत्सवात झाले आहे.हा मोहोत्सव १७,१८ आणि १९ फेब्रुवारी असे तीन दिवस चालणार आहे. जुन्नर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होत असून यामुळे जुन्नर तालुक्याचे ग्रीन झोन म्हणून वेगळे महत्त्व प्रस्थापित होत आहे.
यामध्ये पर्यटकांसाठी द्राक्षबागा भेटी, द्राक्ष,बेदाणे आणि द्राक्षज्युस विक्री तसेच द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी द्राक्ष पीक स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांक द्राक्षकिंग व उत्तेजनार्थ चार क्रमांक काढण्यात येणार आहेत. द्राक्षकिंग साठी बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम २१०००/- , सन्मानचिन्ह व सपत्नीक सन्मान तसेच चार उतेजनार्थ शेतकऱ्यांना प्रत्येकी ११०००/- , सन्मानचिन्ह व सपत्नीक सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक कृषिभूषण जितेंद्र बिडवई यांनी दिली.
यावेळी पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड ऑपरेशनल एक्झिक्यूटिव्ह अजयकुमार कुलकर्णी, कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ धनेश पडवळ, सरपंच आदिनाथ चव्हाण, समीर जाधव, आदी मान्यवर व द्राक्ष उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS