पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी भारत (रजि.) निर्मित भीमपर्व दिनदर्शिका २०२४ लोकार्पण सोहळा शिक्षण...
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य रत्नागिरी भारत (रजि.) निर्मित
भीमपर्व दिनदर्शिका २०२४ लोकार्पण सोहळा
शिक्षणाचे माहेरघर असणारे पुणे या ठिकाणी दि. २१ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन, मालर्पण व पुष्प बहाल करुन एक संघाने बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.
त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डी. बी. ए. साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) या साहित्यिक संस्थेच्या संस्थापिका व संपादिका मा. भावना खोब्रागडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर *भीमपर्व दिनादर्शिका २०२४ प्रत्येकाच्या हाती देऊन लोकार्पण सोहळा संपन्न झाला.* पेढ्यांनी सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.
डी. बी. ए. पुणे विभागीय अध्यक्ष मा. अशोक पवार, डी. बी. ए. सांगली जिल्हा पदाधिकारी मा. विजय वेटम, आणि ज्यांच्या अनमोल अश्या सहकार्यातून हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला ते सामाजिक कार्यकर्ते, नाटककार मा. सुनील जाधव यांनी थोडक्यात आपले मत मांडत डी. बी. ए. च्या कारकीर्दिवर प्रकाश टाकला. त्यांनतर डी. बी. ए. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी ध्येय, उद्धीष्टे समजावून सांगत आपले अध्यक्षीय भाषण केले.
जेवणाचा आस्वाद तर अतुलनीय होता. जेवणात चक्क बिर्याणी, रायता आणि गुलाबजाम, सुरुवातीला केक, बिस्किटे आणि चहाची मेजवानी एका 5 स्टार हॉटेल मध्ये आम्ही हा सोहळा संपन्न केला. अशीच आम्हाला जाणीव झाली. आणि ही सगळी मेजवानी आम्हाला उपभोगायला मिळाली ती म्हणजे मा. सुनील जाधव सर यांच्या मुळे. ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय त्यांनाच जातं. धन्यवाद सुनील जाधव सर.
हा मंगलमय सोहळा पुणे सत्ता ह्या channel ला सुद्धा प्रक्षेपीत करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक सुनील जाधव सर, विजय वेटम सामाजिक कार्यकर्ते, मनोज जाधव सर डीबीए संस्थापक अध्यक्ष, भावना खोब्रागडे मॅडम संस्थापिका व संपादिका, कवयित्री निवेदिका वैशाली लांडगे पुणे जिल्हा अध्यक्षा, संतोष मोहिते पुणे जिल्हा उपाध्यक्ष, अशोक पवार सर विभागीय पुणे जिल्हा अध्यक्ष, आखाडे सर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, समीर शिवगण सामाजिक कार्यकर्ते, अभिजीत जाधव, किशोर भालेराव , राहुल कदम, आशिष जाधव, नरेंद्र पारखे पत्रकार, प्रभाकर शेंडगे सामाजिक कार्यकर्ते, मधुकर लोखंडे, सुनील चव्हाण, रवींद्र जाधव, सुरेश मोहिते, संजीवनी मोहिते, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे निवेदन आणि आभार पुणे जिल्हा अध्यक्ष मा. वैशाली लांडगे यांनी केले.
COMMENTS