प्रा.सतिश शिंदे- क्राईमनामा न्युज हेड निघोटवाडी दि.८ डिसेंबर निघोटवाडी येथील प्रा.श्रीसौ सुरेखा अनिल निघोट यांची सुकन्या चि.सौ.का. डॉ.सोन...
प्रा.सतिश शिंदे- क्राईमनामा न्युज हेड
निघोटवाडी दि.८ डिसेंबर
निघोटवाडी येथील प्रा.श्रीसौ सुरेखा अनिल निघोट यांची सुकन्या चि.सौ.का. डॉ.सोनल आणि वडगाव कांदळी येथील श्रीसौ अलका नाथा नरवडे यांचे सुपुत्र डॉ राहुल यांच्या साक्षगंध कार्यक्रमानिमित्त निघोटवाडी गाव पैपाहुण्यांनी फुलुन गेले होते. निघोटवाडी ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्या युवा कार्यकर्ते व पदाधिकारींनी पार्किंग, कार्यक्रम व बाळासाहेब मोरडे आचारी यांच्या रुचकर भोजनाने साक्षगंध समारंभाचे ऊत्तम नियोजन केल्याने उपस्थितांची गैरसोय टळली.
यावेळी उपस्थित सुरेश भोर जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उच्चशिक्षित वधुवरांस शुभाशीर्वाद देऊन नारायणशेठ निघोट यांच्या आठवणी जागवत वधुपिता प्रा.अनिल निघोट,प्रा.सुरेखा निघोट यांनी मुलीला सुद्धा वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर करुन समाजास आदर्श घालून दिला म्हणून कौतुक केले.प्रा.राजाराम बाणखेले शिवसेना जिल्हा संघटक यांनी शिवसेनेशी पस्तीस वर्षे निष्ठावंत असणारं हे कुटुंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला.तर पोलिस अधिकारी विश्वासराजे थोरात यांनी आंबेगाव तालुक्यात शिवसेना स्थापनेपासुन नारायणशेठ निघोट नेहमी भक्कम मागे उभे राहिले, त्यांच्या नातीच्या साक्षगंध कार्यक्रमास अवघा शिवसेना परिवार उपस्थित आहे, एवढं मोठं योगदान,कोणताही स्वार्थ न ठेवता शिवसेना धर्माचे पालन पैलवान प्रकाश निघोट, अरुण निघोट व सचिनशेठ निघोट यांचे कौतुक केले. यावेळी मंचर चे मा. सरपंच बाळासाहेब बाणखेले, शिवसेना नेते संतोष बाणखेले यांनी डॉक्टर वधुवरांस शुभेच्छा दिल्या.ऊपजिल्हाप्रमुख शरद अण्णा चौधरी, दिलीप पवळे ऊपतालुकाप्रमुख भरतशेठ मोरे गरुडझेप प्रतिष्ठान चे गणेश खानदेशे, शिवसेना समन्वयक बाबाजी शेठ कराळे,वंचित चे उपाध्यक्ष पंकज सरोदे,मा.सरपंच शिवाजीशेठ निघोट यांनी सर्वांचे स्वागत केले.नवनाथ निघोट सरपंच, मा.सरपंच सुमंता निघोट ,खंडुशेठ निघोट, माऊली कराळे राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार दोन्हींचे नेते उपस्थित होते, मित्र,पै पाहुणे, पत्रकार,ग्रामस्थ प्रचंड संख्येने प्रा अनिल निघोट मा.तालुकाप्रमुख भारतीय विद्यार्थी सेना व प्रा.सुरेखा अनिल निघोट तालुका प्रमुख शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव यांच्या प्रेमापोटी साक्षगंध कार्यक्रमास उपस्थित होते.
COMMENTS