पुणे :- १२ जानेवारी, राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवकदिन या विशेष दिवसाचे औचित्य साधून,समाजातील वास्तव सांगुन खरी समानता,एकता, बंधुता ...
पुणे :- १२ जानेवारी, राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवकदिन या विशेष दिवसाचे औचित्य साधून,समाजातील वास्तव सांगुन खरी समानता,एकता, बंधुता मना मनात पेरण्याचे काम मागील पंचवीस वर्षापासुन राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन करत आहे.या आदर्शवादी संमेलनात समाजातील प्रामाणिक सर्वच क्षेत्रात योग्य कार्य करणाऱ्या व्यक्तींचाच सन्मान करण्यात येतो,अनेक नवोदित कवी, लेखक,साहित्यिक,विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती या बंधुता परिवाराने सन्मानित केल्या आहेत.अशा अत्यंत महान कार्य करणाऱ्या संस्थेकडून निगडी प्राधिकरण पुणे,४४ येथील शिक्षिका,लेखिका,कवयित्री,समीक्षक, परीक्षक,निवेदिका,मार्गदर्शिका, समाजसेविका म्हणून प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सौ.प्रतिमा अरुण काळे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा "बंधुता काव्य प्रतिभा" साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक साहित्यिकांचे मत होते अतीशय योग्य व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अध्यापणासोबत,सामाजिक,शैक्षणिक,वैचारिक कार्यात सलग २१ वर्षापासून अखंडितपणे निस्वार्थीपणे,प्रामाणिकपणे काम करत आहेत,राष्ट्रीय बंधुता परीवाराचे पुणे येथे राष्ट्रीय संमेलनांचे उद्घाटन सोहळा प्रसन्न वातावरणात संपन्न झाला यावेळी प्रथम सत्रात,श्री कृष्ण कुमार गोयल (प्रसिद्ध उद्योगपती) मा. संतसींग मोखा, अध्यक्ष, श्रीमती माधुरी ओव्हाळ, स्वागताध्यक्ष ,चंद्रकांत दादा वानखेडे (प्रा. जेष्ठ साहित्यिक), डॉ विजय ताम्हाणे (नेत्र तज्ञ) ,प्रा. प्रदिप पाटील ( शिव व्याख्याते) उत्कृष्ट सुत्रसंचलन श्रीमती संगीता झिंजुरगे, श्री शंकर आथरे, श्री गुलाबराजा फुलमाळी या मान्यवरांच्या उपस्थितीत बंधुताचार्य प्रकाश रोकडे व प्रसिद्ध उद्योगपती श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सौ.प्रतिमा अरुण काळे यांना "बंधुता काव्यप्रतिभा" साहित्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांनतर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्र, नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS