प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर ) मंचर दि.२३ जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंचर येथील नगरपंचायत समोर अय...
प्रतिनिधी : प्रा.अनिल निघोट ( सर )
मंचर दि.२३ जानेवारी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंचर येथील नगरपंचायत समोर अयोध्येत १९९० व १९९२ ला कारसेवेस गेलेल्या कारसेवक शिवसैनिकांचा आणि आंबेगाव तालुक्यात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिपुजनाने झाली.आयोजन प्रा.सुरेखाताई निघोट तालुकाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी , भारतीय विद्यार्थी सेना मा तालुका प्रमुख प्रा.अनिल निघोट, शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे यांनी केले.
यावेळी कारसेवक कट्टर निष्ठावंत शिवसैनिक कै उल्हास लोहोट,के राजु गुळवे,कै.महादु ठोसर,कै.भिकाजी ठोसर,कै. गोविंद येवले,कै.विठ्ठल येवले कै .मनाजी बोनवटे यांच्या नातलगांचा तर राजाराम बाणखेलें, बाळासाहेब शिंदे, भगवान काळे,दिनेश गवळी, ज्ञानेश्वर पडवळ,गोरक्ष राक्षे, बाळासाहेब काळे, अशोक आवटे, राजेंद्र गोडसे यांसह तीस शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आंबेगाव भुषण पुरस्काराने स्नेहा बारवे संपादिका समर्थ भारत माध्यम समूह, डॉ समीर राजे समर्थ भारत, पत्रकार धनंजय पोखरकर दै.बाळकडू, पत्रकार अमोल जाधव सी चोवीस तास यांना सन्मानित करण्यात आले.
गणेशोत्सव नवरात्रोत्सव करंडक स्पर्धेत विजेते मार्केट यार्ड गणेश मंडळ मंचर,बाल विजय गणेश मंडळ मोरडेवाडी, वजीर प्रतिष्ठान मंचर, श्रीकृष्ण प्रतिष्ठान निघोटवाडी, श्रीराम मंडळ निघोटवाडी,न्यु गणेश मंडळ धामणी, गावठाण चा राजा शिवछत्रपती मंडळ पिंपळगाव, त्रिमूर्ती मंडळ,एस कॉर्नर, हनुमान मंडळ मंचर यांना करंडक वितरण करण्यात आले.
यावेळी कारसेवकांचं वतीने शिवसेना जिल्हा संघटक राजाराम बाणखेलें यांनी त्यावेळच्या आठवणी सांगत, अडवाणींच्या रथयात्रेचे मंचर ला स्वागत,शिलापुजन व अयोध्येत कारसेवेस गेल्यावर व येताना कशाप्रकारे जीवावर उदार होऊन शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांचा आदेश पाळला व त्यावेळी जबाबदारी झटकून शिवसेनेवर खापर फोडणारे, न्यायालयीन आदेशाने राममंदिर ऊभे राहिले पण भाजप वाले स्वताचीच टिमकी वाजवत शिवसेनेचं योगदान काय,असा प्रश्न तिथं नसणारे विचारतात, ऊद्धव जी ठाकरेंना शेवटी आमंत्रण पण सेलेब्रिटींना घरपोच आमंत्रण,हे जनता पहातेय,असे प्रतिपादन केले.तर स्वागतपर भाषणात आयोजक प्रा अनिल निघोट यांनी शिवसेना अयोध्येत नव्हती असं खोटं बोलणारांना उघडं पाडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील कट्टर निष्ठावंत तीस शिवसैनिकांचा भव्य सत्कार ठेवून त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करत असुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवायचा प्रयत्न करणारे संपले पण कपटि कारस्थानींनी अनेक आघात करुनही मराठी माणसांची बलाढ्य संघटना तशीच ऊभी आहे, हे शिवसेना द्रोही ना ऊत्तर आहे.
कार्यक्रमासाठी डोंबिवली उपविभाग प्रमुख गोरक्ष खोकराळे मंचर नगरपंचायत संपर्क प्रमुख अरुण बाणखेले, युवासेना तालुकाप्रमुख विवेक पिंगळे,वहातुक सेना तालुका प्रमुख संजय चिंचपुरे ,शहरप्रमुख विकास जाधव, निघोटवाडी ग्रा.पं.सदस्य संदिप निघोट, चेतन निघोट,पेशवाई कलेक्शन चे चंद्रकांत निघोट,मा. सैनिक मारुती निघोट , विनोद घुले, अजित मोरडे, महेश घोडके, शंकर डोकडे, वैभव कराळे ,खादी ग्रामोद्योग उपाध्यक्ष विजय जाधव, कारेगाव तंटामुक्ती उपाध्यक्ष भानुदास कराळे, संघटिका ऊज्वला नाईकडे, बाळासाहेब थोरात, दिलीप बाणखेले, ऊत्तम भेके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मिथुन पांचाळ यांनी केले.
COMMENTS