प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर ) जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १६ ते २२ जान...
प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर )
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १६ ते २२ जानेवारी २०२४ रोजी मौजे. देवळे (चिंचेचीवाडी) येथे युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, ' विशेष श्रमसंस्कार शिबिर' मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये सात दिवस विविध प्रकारची कामे यामध्ये कृत्रिम जलाशयातील गाळ काढणे, भैरवनाथ मंदिर परिसराची स्वच्छता व त्या परिसरातील कातळशिल्पे शोधली, वृक्षारोपणासाठी खड्डे, रस्ता दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, एस. टी. बस सेवा सुरळीत होण्यासाठी पार्किंगची दुरुस्ती व इतर वेगवेगळी कामे स्वयंसेवकांनी केले . तसेच दुपार सत्रामध्ये डॉ. अशोक दुशिंग यांनी 'लोकसंख्या नियंत्रण जनजागृती', मा. श्री. अरुण बोऱ्हाडे यांनी 'व्यसनमुक्त तरुण व्यसनमुक्त भारत', डॉ. दत्तात्रय चव्हाण यांनी 'ग्रामीण उद्योजकता', मा. श्री. तान्हाजी बोऱ्हाडे यांनी 'चला शिवराय समजून घेऊया', डॉ. विलास गोर्डे यांनी 'स्थानिक इतिहास लेखन' इ. विषयावर मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली. तसेच या शिबिरात स्वयंसेवकांची मनोगते, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गटचर्चा, भजन, पर्यावरण जनजागृतीसाठी पथनाट्य, स्थानिक महिला लेझीम पथकाने स्वयंसेवकांना लेझीम प्रशिक्षण दिले तसेच लोकगीते व नकलांचा कार्यक्रम घेण्यात आला.
संपूर्ण शिबिरासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे , संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे, उपप्राचार्य डॉ.रवींद्र चौधरी, प्र. प्रबंधक सौ. मनीषा कोरे आदींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. या शिबिरासाठी देवळे (चिंचेचीवाडी) येथील लोकनियुक्त सरपंच दीपक घुटे, उपसरपंच सौ. मंदाकिनी बोऱ्हाडे, मोहन घुटे, शिवाजी बोऱ्हाडे, जि. प. प्रा. शाळा मुख्याध्यापक गणेश भोर, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप खिलारे, प्रा. संदीप लाढाणे, प्रा. अनिशा दुराफे, प्रा. जयश्री कणसे, प्रा. अंकिता वाळुंज यांनी केले. तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री सिताराम शेळकंदे, श्री एकनाथ घुटे व सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.
COMMENTS