अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी संग्रामपूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र एच .डी.एफ.सी नांदुरा अर्बन व एस.बी.आय अशा चार अधिकृत बँका असून चारही बँ...
अमीन शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
संग्रामपूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र एच .डी.एफ.सी नांदुरा अर्बन व एस.बी.आय अशा चार अधिकृत बँका असून चारही बँकांना एटीएम सुविधा उपलब्ध आहे परंतु फक्त एच डी एफसी एटीएम वरच सिक्युरिटी गार्ड आहे बाकी तीन ही बँकेच्या एटी एम वर सिक्युरिटी गार्ड ठेवलेला नसल्यामुळे एस .बी.आय बँक शाखा संग्रामपूर येथील एटीएम वर चोरट्यांनी 20लाख रु चा डल्ला मारला याची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात सुरुवात केली बँक एटीएम वरील सीसीटीव्ही फुटेज चेक केली असता त्यात चार ते पाच अज्ञात आरोपी आढळून आले सदर चोरट्यांनी एटीएमला दोरी बांधून पांढऱ्या रंगाच्या मालवाहक गाडीच्या सहाय्याने ओढून सदर एटीएम मशीन गाडीत टाकून चोरून नेली त्यामध्ये 17 लाख 78 हजार रुपये कॅश व हायसन कंपनीची एटीएम मशीन किंमत दोन लाखां 22000 असा एकूण वीस लाख रुपयांच मुद्देमाल चोरून नेला व एटीएम रूमची तोडफोड करून नुकसान केले ही घटना आज दिनांक 7 जानेवारी रोजी पहाटे 3 ते 3.30 च्या दरम्यान घडली या घटनेची शेखर सहदेव चौरे वय 42 यांनी तामगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली अशाफिर्यादीनुसार पोलिसांनी अप क्रमांक 05/ 24 कलम380, 427, 34 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे बुलढाणा डॉगस्कॉड पथक तपासा करत आहेत परंतु संशयास्पद वस्तू मिळून आले नाही सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार उलेमाले करीत आहे
तर मौज पुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे एटीएम मशीन
कट करताना चोरटे दिसले तर पोलिसांना पाहून ते तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यापैकी दोन आरोपींना जागेवर पकडले असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य साधने तसेच एक एसबीआय कंपनीचे एटीएम मशीन व एक विना नंबरची अशोक लेलँड कंपनीचे पिकप वाहन असे मिळून आले आहे सदर आरोपींविरुद्ध मौजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 6/2024 भादंवि कलम 399,402 सह आर्म ऍक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे
1) 1)दयासिंग गुलजार सिंग टाक वय 45 वर्षे
2)नरसिंह अतरसिंग बावरी वय 60 वर्षे दोघे रा.शिकलाकारी मोहल्ला मंगळ बाजार ता.जि.जालना
पळून गेलेला आकाशसिंग नरसिंग बावरी व ईतर दोन अनोळखी इसम असे असून
कृपया आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठे एटीएम मशीन फोडून त्यातील एटीएम चोरून घेऊन गेलेले असेल तर मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे संपर्क करावा असे आवाहन
मौज पुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना यांच्याकडून करण्यात आला असून तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळंके तसेच बीट जमदार कुसुंबे यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनची बरीच टीम त्या ठिकाणी गेली आहे
COMMENTS