प्रतिनिधी : निलेश गाडगे ( निमगाव सावा ) जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावात नमो फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले हो...
प्रतिनिधी : निलेश गाडगे ( निमगाव सावा )
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावात नमो फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात रुग्णांची तपासणी करण्याकरिता डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव पुणे यांच्या वतीने तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले.
अशी माहिती नमो फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल विठ्ठल गाडगे यांनी दिली.
या शिबिरात निमगाव सावा तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक गरजू रुग्णांनी सहभाग नोंदवला.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सुनिल गहिने मोरया प्रतिठाण अध्यक्ष किरण गोत्राळ लहुजी क्रांती अध्यक्ष सनी उनवणे, भालचंद्र उनवणे सागर उनवणे जितेंद्र बेहडे नवनाथ गाडगे पांडुरंग तनपुरे राजू पठाण आयुब पठाण यांची मोलाची साथ लाभली.
COMMENTS