प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर ) जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे राजमाता जिजाऊ महिला अभ्यास केंद्र अंतर्गत 'मी राज...
प्रतिनिधी : प्रा.शरद मनसूख ( सर )
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे राजमाता जिजाऊ महिला अभ्यास केंद्र अंतर्गत 'मी राजमाता जिजाऊ बोलतेय' हा एकपात्री नाट्यप्रयोग राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी हे उपस्थित होते . या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री व एक पात्री नाटय कलाकार प्रा. वैशाली हेमंत सावंत यांनी हा नाट्यप्रयोग सादर केला. यामध्ये त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्याप्रमाणे वेशभूषा करून आपल्या उत्कृष्ट संवाद व अभिनयातून जिजाऊंचे विचार व कार्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर मांडले व जिजाऊ आणि शिवबा यांचा केवळ जयघोष न करता त्यांच्या विचारांना आचरणात आणणे ही आजच्या काळाजी गरज आहे तसेच जिजाऊंच्या उत्तम संस्कारांतून व शिवाजी महाराज यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असे विचार त्यांनी आपल्या एकपात्री नाटय प्रयोगातून मांडले . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी सांगितले ' खऱ्या अर्थाने आजच्या आधुनिक युगातही राजमाता जिजाऊचे विचार व कार्य आपल्या तरूण पिढीला प्रेरणादायी व कृतीशील बनवू शकतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिशा दुराफे यांनी केले व आभार प्रा. जावेद शेख यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले . हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ महिला अभ्यास केंद्र या विभागातील संचालिका प्रा. डॉ. सुप्रिया काळे, व सदस्य प्रा. जावेद शेख, प्रा. अनिशा दुराफे, प्रा. गौरी शेटे व प्रा. ऋतुजा तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS