प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट. ( सर ) मंचर दि.आंबेगाव) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत मावळ तालुक्यातील आंबे येथील पद्मभूषण वसंत दादा पाटी...
प्रतिनिधी प्रा.अनिल निघोट. ( सर )
मंचर दि.आंबेगाव) महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत मावळ तालुक्यातील आंबे येथील पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्वेता गायकवाड, उत्कर्षा ननावरे, अदिती मानकर,साक्षी राऊत,सेजल चौधरी,ओरगंती जान्हवी या कृषी कन्यांचे आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे आगमन झाले. नांदूर गावचे सरपंच:सौ.पुनम वायाळ,उपसरपंच: श्री.शेखर चिखले ग्रामपंचायत सदस्य सौ .पूजा भोर, सौ.सुरेखा भालेरा,सौ.सोनल जाधव,विजय चिखले,गणेश वायाळ व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्याच्या कालावधीत कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम गावातील पीक पद्धती आधुनिक शेती माहिती सहकारी विन संस्थांची कार्यक्रम पद्धती पीक प्रात्यक्षिके माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण इतर शेती बाबत माहिती देणार आहे, शेती उपक्रमांचा लाभ घ्यावा असे कृषिकन्यांकडून आव्हान करण्यात आले आहे.
COMMENTS