प्रतिनिधी : जुन्नर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर (कुकडेश्वर) शाळेतील माता पालक गटासाठी हळदी कुंकू समारंभ व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात ...
प्रतिनिधी : जुन्नर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर (कुकडेश्वर) शाळेतील माता पालक गटासाठी हळदी कुंकू समारंभ व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार" विजेत्या ,आदर्श मुख्याध्यापिका सौ.सुरेखा बोचरे यांचे महिलांसाठी "शिक्षणात महिलांचे स्थान व महिलांचे आरोग्य" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
छोट्याशा शाळेत आयोजित या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. शेतीची कामे बाजूला ठेवून महिलावर्ग मुलांच्या शिक्षणासाठी एकत्र आला होता.शाळेच्या विकासासाठी सर्व महिला यापुढे एकत्र येवून काम करणार असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी व जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन मुळे,जिजाबाई दिवटे यांनी केले.आभार रंजना दिवटे यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व महिलांना वाण,तिळगुळ व फळे वाटप करण्यात आले.
COMMENTS