पुणे : जुन्नर तालुक्यातील तेजूर गावचे पोपटराव वाघमारे तेजूरकर ( सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पुणे ग्रामीण ) यांची भारतीय जनता पार्...
पुणे : जुन्नर तालुक्यातील तेजूर गावचे पोपटराव वाघमारे तेजूरकर ( सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पुणे ग्रामीण ) यांची भारतीय जनता पार्टी उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील ( राजगुरूनगर खेड ) येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या समवेत हि निवड झाली.
वाघमारे हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक पुणे ग्रामीणचे अधिकारी होते, त्यांची सामाजिक, राजकीय व सर्वसामान्यांच्या समस्यांची व समस्या सोडविण्याबद्दलची तळमळ पाहता व ग्रामीण भागातील एक बहुआयामी व्यक्तीमत्व पाहून व आपल्या सामाजिक बांधिलकीची आवड पाहता त्यांना भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ( अ.जा. ) यांचा प्रवेश झाल्याने उत्तर पुणे जिल्ह्यातून व पुण्यातील कार्यकर्ते व तेजूरकर व्यक्त करत आहेत.
या कार्यक्रमप्रसंगी सन्मा.शरद बुट्टे पाटील ( भा.ज.पा पुणे जिल्हा अध्यक्ष ), सन्मा.आशाताई बुचके ( जिल्हा नियोजन समिती ), विनोद भालेराव ( भा.ज.पा.खेड अध्यक्ष ), सन्मा.दिलीप गांजाळे ( मा.सदस्य पं.स.जुन्नर ), सन्मा.रौंदळ साहेब, सन्मा.संतोषनाना खैरे, सन्मा.अनिलशेठ मेहेर ( माजी नगराध्यक्ष जुन्नर ), सन्मा.जनार्दन मरभळ ( क्रृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जुन्नर ) उपस्थित होते.
COMMENTS